‘या’ आरोग्यकेंद्रालाच आहे ‘उपचारा’ची गरज…
सातारा ( महेश पवार):
सातारा तालुक्यातील परळी विभागातील करंडी येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या फंडातून कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. यांचा परिसरातील जकातवाडी , शहापूर,उफळी या गावांना यांचा फायदा होणार आहे , परंतू गेले दोन ते तीन वर्षे झाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मनुष्य बळ मिळत नसल्यामुळे उद्घाटन रखडले असून यामुळे उद्घाटन होण्याआधीच त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्याची वेळ आली.
परिसरात झुडपे वाढल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रांची खुप बिकट अवस्था झाली आहे . याकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळे येथील रूग्णांची गैरसोय होत आहे.
करंडी चे सरपंच शशिकांत जाधव यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने लवकरात लवकर सुरू करून लोकांची गैरसोय थांबवून लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे , तसेच सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः लक्ष घालून सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत .