कास पठारावरील अनधिकृत बांधकामांबाबत दोन्हीं राजे आमनेसामने…
सातारा:
जागतिक वारसास्थळ म्हणून युनोस्कोने आपल्या पुस्तकात नोंद घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील कास परिसरातील अनाधिकृत बांधकामाबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सातारचे दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत.
मात्र एक राजा हा ही अतिक्रमणे कायम करावी अशी मागणी करत असताना दुसरा राजा हा निसर्गाचा समतोल राखला जावा अशी भुमिका घेत अतिक्रमणे काढावी अशी भुमिका घेतली आहे.खा. उदयनराजे भोसले यांनी आज सकाळच्या सत्रात सातारा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना कास परिसरातील निसर्गाचा समतोल राखला पाहिजेत या साठी अनाधिकृत बांधकामे काढली पाहिजेत अशी भुमका घेतली.
तर दुपारच्या सत्रात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्यांनी आपल्या स्वताच्या मालकी जागेवर बांधकामे केली आहेत त्यांची बांधकामे अधिकृत करा अशी मागणी करत त्यांनी बांधकामे पाडण्याची भुमिका जर प्रशासनाने घेतली तर आम्हाला बायका पोरांसमवेत रस्त्यावर झोपावे लागेल अशी उग्र भुमिका घेतली आहे.