सातारा ‘आरटीओ’चा ‘तो’ वाहन तपासणीचा ट्रॅक बेकायदेशीर ?
सातारा (महेश पवार) :
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात उभारण्यात आलेला वाहन तपासणीचा ट्रॅक हा बेकायदेशीर असल्याची माहिती राष्ट्रमत च्या हाती लागली आहे.
या बेकायदेशीर ट्रेकमुळे या कार्यालयात येणाऱ्या तसेच परिसरात ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका असून , या ठिकाणी तपासण्यात येणारे वाहन ही योग्य प्रकारे तपासणी जात नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरे तर या ठिकाणी वाहन तपासणीसाठी ही Dry Hard level surface, कोरडा कठीण समतल पृष्ठभाग असलेल्या रस्त्यावर ब्रेक टेस्ट घ्यावी असं नियमात सांगितले गेले आहे. तसेच रस्ता १५० मीटर कमीत कमी असावा . तसेच तो परिसर कुंपणाने बंदिस्त व इतर वाहतूक व सामान्य जनतेचा वावर नसलेला असावा.
असं असताना सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील ट्रॅक, कार्यालयाच्या आत रहदारीच्या व सामान्य जनतेचा रहदारी चा रस्ता असून या ठिकाणी असलेला रस्ता हा समतोल नसून उताराचा आहे. इतकेच नव्हे तर या कार्यालयात येण्यासाठी तीन प्रवेशद्वारे असून वाहन तपासणी मार्गावर असलेले प्रवेशद्वार उघडं असतं, यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रसंग उद्भवतात.
तर दोन प्रवेशद्वारे बाहेरील रहदारीच्या हमरस्त्यावर असल्याने या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रेक हा बेकायदेशीर असून अत्यंत धोकादायक आहे . यामुळे खरंतर जिल्हाधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून हा ट्रॅक शहराबाहेर नेणं गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.