सातारा
भर दिवाळीदिवशी शिवतीर्थ अंधारात…
सातारा (महेश पवार) :
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजधानी साताऱ्यातील पोवई नाका परिसरातील शिवतीर्थ ऐन दिवाळीच्या दिवशी अंधारात गेल्याने शिवप्रेमी मध्ये नाराजी पसरली आहे. दिवाळी दिवशी जेव्हा संपूर्ण शहर रोषणाईने उजळले असताना जिल्हा प्रशाशनाने शिवतीर्थाकडे कसे काय दुर्लक्ष केले असा सवाल विचारला जात आहे. जोडीला शहरातील मुख्य ठिकाणी असणाऱ्या या शिवतीर्थाकडे राजकीय नेते मंडळींनी देखील आजच्या दिवशी पाठ फिरवल्याने नागरिकांत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.