‘भूमिपुत्र तरुणांचा त्रास थांबवा, अन्यथा…’
काणकोण:
“आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा” योजने अंतर्गत काणकोण येथे गाडे चालवणाऱ्या भुमिपुत्रांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून राजकीय सूडबुद्धीने त्रास दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस (congress) नेते जनार्दन भंडारी यांनी केला आहे. हे प्रकार न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेस (congress) नेते जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी जागृत काणकोणकर आणि जनसेना वॉरियर्स यांनी सोमवारी काणकोणचे मुख्य अधिकारी मधु नार्वेकर यांना या मुद्द्यावरुन घेराव घातला.
भंडारी म्हणाले की, सुशिक्षित तरुणांना त्रास होत असल्याने काणकोण काँग्रेस परिवार आणि जनसेना वॉरियर्स या संघटनेने मुख्यमंत्री, इतर मंत्री आणि विविध सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
“आमचे काणकोण येथील भूमिपुत्र हातगाडी/गड्ड्यांद्वारे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु सत्ताधारी राजकीय नेत्यांकडून त्यांचा छळ होत आहे. हे असेच सुरू राहिल्यास त्यांना त्रास होईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल.” असे भंडारी म्हणाले.
ते म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या भयानक टप्प्यानंतर सरकारने गोव्यात 1 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यातील आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी आणि गावकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि चांगल्या उपजीविकेसाठी मार्ग तयार करण्यासाठी “आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा” योजना सुरू केली होती.
“परंतु आता असे दिसते आहे की सत्ताधारी राजकीय नेते स्वतःच्या सरकारच्या कल्पनेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि म्हणून ते स्थानिक तरुणांच्या मागे लागले आहेत आणि त्यांचे व्यवसाय थांबवण्यासाठी त्यांचा छळ करत आहेत,” असे भंडारी पुढे म्हणाले.
” या निवेदनमध्ये एक प्रकरण उद्धृत केले आहे जिथे पाळोले समुद्रकिनारी हातगाडी सुरू करणाऱ्या एका स्थानिक तरुणावर अन्याय झाला होता. हा तरुण काणकोणच्या विविध विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच आघाडीवर होता आणि काणकोणच्या भल्यासाठी विविध आंदोलनांमध्ये सहभागी झाला होता. मात्र दुर्दैवाने तो सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा समर्थक नसल्याने त्याला त्रास देण्यात आला. स्थानिक आमदाराच्या व्यक्तीला त्याची हातगाडा दिसला आणि त्यने तात्काळ स्थानिक आमदारांच्या निदर्शनास आणून दिला व जबरदस्तीने त्याचा व्यवसाय बंद पाडला.जबरदस्तीने बंद केल्याने हजारोंचे मोठे नुकसान झाले. तरुणांचे रूपये माल व इतर साहित्य वाया गेले.काणकोणातील भूमिपुत्र इथे व्यवसाय का करू शकत नाहीत? लोकप्रतिनिधी राजकीय विरोधकांना का त्रास देतात?राजकीय सूड उगवण्यासाठी गरीब स्थानिक तरुणांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे योग्य आहे का? ?,” असे प्रश्न भंडारी यांनी केले आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही जाहीरपणे कबूल केले आहे की ते गोव्यातील प्रत्येकाला सरकारी नोकऱ्या देऊ शकणार नाहीत आणि म्हणून गोव्यातील लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून “स्वयंपूर्ण” बनण्याचा सल्ला दिला होता.
काणकोण पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षांनीही काणकोणच्या भूमिपुत्रांना जाहीर पाठिंबा दिला असून गोव्यात व्यवसाय करण्याचा अधिकार फक्त गोवावासीयांना आहे, असे ते म्हणाले. मात्र, मुख्याधिकारी मधु नार्वेकर हे भीमीपुत्रांना त्रास देत आहेत, असे भंडारी म्हणाले.
आज पासून ह्या भुमिपुत्राना व्यवसाय करण्यास द्यावा असे त्यांनी म्हटले आहे.
भुमिपुत्रांना व्यवसाय करण्यास दिला नाही तर बाहेरील लोकांच्या अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम हाती घेऊ आणि ते बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे.