उदयनराजेच्या ‘आस्ते कदम’ने परळी खोऱ्यातील राजकारण तापले…
सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील परळी खोरं म्हणजे दोन्ही राजेंचा एकेकाळचा बालेकिल्ला परंतु उरमोडी धरणाच्या विज प्रकल्पात झालेल्या त्या राड्यानंतर उदयनराजें परळी भागात फिरकलेच नाहीत अशी परळी खोऱ्यात चर्चा आहे , यामुळे उदयनराजे यांची परळी भागावरील पकड कमी झाल्यामुळे दहा वर्षांत परळीची एकहाती सत्ता काबीज करण्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यशस्वी झाले.
उदयनराजे आणी शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाकयुद्ध नेहमीच सुरू असतं . आणि आरोप प्रत्यारोप सुरूच असतात , मात्र अचानक दुर्लक्षित परळी खोऱ्यात आस्ते कदम , आस्ते कदम महाराज येत आहेत परळी जिल्हापरिषद गटात असे बॅनर लागल्याने परळीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
परळी भागात उदयनराजे पुन्हा सक्रिय जरी झाले तरी उदयनराजेना परळी खोऱ्यात कार्यकर्ते जमवाजमव करण्यासाठी आपार कष्ट घ्यावे लागणार असून, शिवेंद्रसिंहराजे यांच्या गेल्या दहा वर्षांपासून ताब्यात असलेल्या परळी खोऱ्याला ताब्यात घेणं सुध्दा सोपं नाही.
यामुळे आगामी काळात कोण परळी काबीज करणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले….