अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा
अर्थसंकल्प 2024-25 : ‘काय’ आहे विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया?
पणजी :
2023-2024 च्या अर्थसंकल्पीय घोषणांवरील कृती अहवालाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार नापास ठरले आहे. आर्थिक वर्षात केवळ 27.9% घोषणाच प्रत्यक्षात उतरल्या आहेत. 390 घोषणांपैकी केवळ 109 पूर्ण झाल्या, 279 पूढे चालीस लागणार आहेत आणि 2 सरकारने रद्द केल्या आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मोठी घोषणा शून्य पूर्णता” हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे धोरण आहे. 2024-25 साठी 26855 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून “फील गुड फॅक्टर” तयार करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प ‘गुड फॉर नथींग’ आहे, असेही युरी आलेमाव यांनी यावेळी सांगितले.