गोवा

इएसजीच्यावतीने आयोजित होत आहे ‘पुरुमेंताचें फेस्त’

पावसाळ्याच्या पारंपरिक जीवनशैलीचा सुगंध आणि स्थानिक उत्पादनांची चव अनुभवण्याची संधी देणारा “पुरुमेंताचें फेस्ट” महोत्सव १ ते ३ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. गोवा मनोरंजन सोसायटी (ESG) तर्फे हा महोत्सव मल्टिप्लेक्स प्रांगणात भरविण्यात येणार आहे.

या महोत्सवासाठी गोव्यातील कारागीर, स्वयं सहाय्यता गट, उद्योजक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून स्टॉलसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

स्टॉलमध्ये सुक्या माशांचे पदार्थ, कृषी उत्पादने व मसाले, गोवन पारंपरिक गोड पदार्थ, घरगुती साधने व भांडी, मातीची भांडी व कलाकुसरीच्या वस्तू, साठवणीसाठी सिरेमिक वस्तू, नर्सरी व किचन गार्डन उत्पादने, स्थानिक तेल, कच्चा आंबा, काजू, कोकम, चिंच यांसारख्या हंगामी फळांपासून तयार उत्पादने, लोणची, मसाले, पापड यांसारखे घरगुती पदार्थ, नारळाच्या शेंड्यापासून तयार वस्तू, पारंपरिक मासेमारी साधने तसेच स्थानिक धान्य व मिलेट्स यांचा समावेश असेल.

अर्ज फॉर्म ESG कार्यालयात तसेच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.esg.co.in) उपलब्ध आहेत. स्टॉलचे वाटप ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्वावर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!