सिनेनामा 

‘गणपती तू सर्वश्रेष्ठ’ ठरला बेस्ट म्युझिक व्हिडिओ…

गोव्यातील ३ऱ्या आवृत्तीच्या ‘वेव्ह्स इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘गणपती तू सर्वश्रेष्ठ’ या संगीत व्हिडिओने ‘बेस्ट म्युझिक व्हिडिओ’ पुरस्कार पटकावला. नीलय नाईक आणि त्यांच्या टीमने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विशेष यश संपादन केले.


या पुरस्कारप्राप्त संगीत व्हिडिओचे दिग्दर्शन रामप्रसाद आडपईकर यांनी केले असून, आदेश करवारकर यांनी ‘विजू प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. आकर्षक दृश्यरचना, संगीत आणि भक्तिमय सादरीकरणामुळे या व्हिडिओला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली.


या यशाबद्दल नीलय नाईक आणि संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोव्यातील कलाक्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!