देश/जग

दिल्लीत हॉटेलला भीषण आग, 21 मृत्यू

राजधानी दिल्लीतून एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागात असलेल्या ‘लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली.

आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. नवी दिल्लीतील मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटला भीषण आग लागली होती. ही आग आता अटोक्यात आणण्यात आली आहे. तर, मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

दिल्ली अग्निशामक दलाला (DFS) सकाळी पावणे दहा वाजता लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांनी तळघरातून तीन जणांची सुटका केली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेहरू प्लेस अग्निशामक केंद्राचे विभागीय अधिकारी रवींदर हे स्वतः घटनास्थळी उपस्थित झाले.

मालवीय नगरचे आमदार सतीश उपाध्याय यांनी सांगितलं की, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. “आम्ही तातडीने संपूर्ण यंत्रणा सक्रिय केली. आपत्ती व्यवस्थापन संघ, आमच्या भागातील जिल्हा दंडाधिकारी, स्टेशन हाऊस ऑफिसर, उपविभागीय दंडाधिकारी आणि महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला. मी स्वतःही घटनास्थळी आलो आहे.” आगीचे नेमके कारण योग्य तपासणीनंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्यात मदत केल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण जिल्ह्याचे एसडीएम, डीडीएमए जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, आग बहुदा रेस्टॉरंटमधूनच सुरू झाली असावी. मात्र, आमच्याकडे अजून पूर्ण तपशील आलेला नाही. चार मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि ओळखीबाबत आम्ही अधिकृत पुष्टीकरणाची वाट पाहत आहोत. याशिवाय, जखमींसह इतर ७ ते ८ लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.”

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, “मालवीय नगरमधील भीषण आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. दिल्ली सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पीडित कुटुंबांना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत आणि साहाय्य पुरवले जात आहे. या दुःखाच्या प्रसंगी दिल्ली सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी साहाय्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!