देश/जग

34 व्या अखिल भारतीय कोंकणी अधिवेशन अध्यक्षपदी नंदगोपाल शेनॉय

मंगळूर : ‘कोंकणी भास आनी संस्कृती प्रतिष्ठान’ आणि वर्ल्ड कोंकणी सेंटरचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सीए नंदगोपाल शेनॉय यांची अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या ३४व्या अखिल भारतीय कोंकणी अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे येथे नोव्हेंबरमध्ये हे अधिवेशन होणार आहे.


शेनॉय यांच्या निवडीबद्दल प्रतिष्ठान आणि वर्ल्ड कोंकणी सेंटरचे पदाधिकारी, विश्वस्त, सदस्य तसेच विश्व कोंकणी सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


अधिवेशनात कोंकणी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीशी संबंधित विविध विषयांवर विचारविनिमय होणार आहे. देशभरातील कोंकणी भाषिक, साहित्यिक, कलाकार आणि सांस्कृतिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.


कोंकणी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांवरही अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!