गोदरेज अप्लायन्सेसची दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना गृहउपयोगी उपकरणांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोदरेज अप्लायन्सेसने विशेष सणासुदीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ‘गोदरेज वॉरंटी प्रॉमिस’अंतर्गत कंपनीने निवडक उत्पादनांवर पाच वर्षांची वॉरंटी देण्याची घोषणा केली आहे. एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कूलर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि डीप फ्रीझर या उत्पादनांच्या खरेदीवर ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
जुन्या उपकरणांच्या बदल्यात नवीन उत्पादने खरेदी करण्याची संधी, उत्पादनांच्या खर्चाबाबत पारदर्शक माहिती, सुलभ हप्त्यांची सुविधा आणि आकर्षक कॅशबॅक अशा विविध लाभांचा या योजनेत समावेश आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना नवीन गृहउपयोगी उपकरणे खरेदी करणे अधिक सोयीचे होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
ग्राहकांचे वाढते उत्पन्न आणि शहरीकरणामुळे मोठ्या क्षमतेच्या वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर तसेच उच्च दर्जाच्या एअर कंडिशनरची मागणी वाढत आहे. त्यातच सणासुदीच्या काळात उपलब्ध होणाऱ्या कॅशबॅक आणि सुलभ हप्त्यांच्या योजनांमुळे ग्राहकांचा नवीन उपकरणांच्या खरेदीकडे कल वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाचे बिझनेस हेड कमल नंदी म्हणाले, “ग्राहक घरासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना तिची गुणवत्ता, किंमत आणि दीर्घकालीन उपयुक्तता यांचा विचार करतात. ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन आम्ही पाच वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. घरात नवीन उपकरण आणण्याचा अनुभव आनंददायी आणि चिंतामुक्त असावा, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे वॉरंटीसह इतर सणासुदीच्या ऑफर्समध्येही खर्चाबाबत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दर्जेदार उत्पादने खरेदी करणे सोपे होईल.”
ते पुढे म्हणाले, “दर्जेदार उत्पादने, ‘गोदरेज प्रॉमिस’अंतर्गत देण्यात येणारे फायदे आणि विक्री केंद्रांच्या वाढत्या संख्येच्या जोरावर यंदाच्या सणासुदीच्या हंगामात आमच्या उत्पादनांच्या विक्रीत ४० टक्के वाढ होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”



