लेख
कुर्बानी, अल्लाहसाठी कि…
– अस्लम जमादार
‘कुर्बानी– कुर्बानी…अल्लाह को प्यारी है कुर्बानी…’ हे १९८० सालातील गाजलेले एक सिनेगीत. आज हि कुर्बानीबद्दल एक आदराची भावना केवळ मुस्लिमच नव्हे ते तर इतर धर्मियांमध्येही निर्माण करतात . खरे तर कुर्बानी म्हणजे बकरी , प्राणी ह्यांचा अल्लाह साठी बळी देणे. आणि त्याद्वारे मौज मजा अर्थात चंगळवाद आणि आपले चोचले तृप्त करणे असाच होत चालला आहे कि काय असे खेदाने म्हणावे लागते. अल्लाहसाठी कुर्बानी बकरीचा बळी देणे म्हणजे मीच खरा भक्त आणि हा बकरा देखील हजारो नव्हे तर लाख रुपयात त्याची रक्कम मोजत मीच कसा श्रेष्ठ हे इतरांना दाखविण्याचे चित्र हे लांच्छनास्पद आहे. आज जर प्रेषित असते तर त्यांना शरमेने मान खाली घालावी लागली असती . असे खेदाने म्हणावे लागेल.
खरे तर बकरी ईद चा इतिहास हा खरे तर एका पिताचा अल्लाह ने घेतलेली एक परीक्षाच होती. ह्या परीक्षेत प्रेषित इब्राहिम ह्यांनी अल्लाहचा संदेश पळत चक्क आपल्या मुलाचा इस्माईल बळी देण्यासाठी सुरा त्याच्या गळ्यावर चालविणे आणि अल्लाह खुश होऊन त्या ठिकाणी बकरीची उपस्थिती निर्मण करत आपल्या भक्ताला चकित करत त्यांच्या मुलाचा जीव वाचविणे ह्यातून आपण काय सार घेणार आहोत? हे हजारो वर्ष पासून आलेली हि परंपरा अशीच पुढे चालू असणार आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
आज ईदच्या निमिताने जग भरातील सुमारे २ अब्ज हुन अधिक मुस्लिम हा पवित्र सण साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनाच्या २ वर्षंच्या महामारीनंतर हा सण येत असल्याने चैतन्याचे वातावरण जगभरातील मुस्लिम बांधव आणि मुस्लिम राष्ट्र मध्ये आहे. जगभरातील मुस्लिम लोकसंख्येच्या केवळ ४ किंवा ५ % मुस्लिम बांधव ह्यांनी जरी बकरीचा बळी दिला तर हि संख्या कोटीच्या वर जाऊ शकते. अर्थात ह्या सर्वात मोठ्या घटनेमुळे अर्थ व्यवस्था १ लाख कोटी एवढी उलाढाल अपेक्षित आहे. ह्यामुळे बकरी, बैल, उंट व इतर प्राणी वर्ष पासूनच त्याची योग्य पैदास होण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते. पाश्चिमात्य व इतर अनेक देश मध्ये रेड मीट ह्या व्यवसायकडे विशेष लक्ष पुरविले जाते.
अर्थात ईदच्या निमित्ताने बकरीचा बळी देण्यात यावा असा मुळीच उद्देश ह्या लेखामागचा नाही. बकरीचे मांस किंवा रक्त हे अल्लाहकडे कधीच पोहोचत नाही किंवा अल्लाह ला तशी अपेक्षा देखील नसते. कुर्बानी द्वारे खरे तर मी समाजाला देणे लागतो ह्या भावनेतुन काय देता येईल का ? हा विचार पुढे येणे गरजेचे आहे असे अनेक मुस्लिम विचारवंत ह्यांना वाटते .म्हणूनच मुस्लिम ह्यांची पंढरी सौदी अरेबिया तसेच अनेक मुस्लिम राष्ट्र तील बुद्धिवादी विचारवंत ह्यांच्या मध्ये बदलाचे वारे ह्या शतकामध्ये वाहू लागले आहेत हि खरोखरच कौतुकाची बाब म्हणावी लागेल. एवढेच काय महाराष्ट्रातील पुण्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक चळवळ. रोशन वेलफेयर फौंडेशन सारख्या अल्पसंख्यांकांतील सेवाभावी संस्था २००४ पासून मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच आपले दान अर्थात कुरबानी हि रक्तदान, अवयवदान चळवळीतून उभी करता येईल का ? असे प्रबोधन करू लागले आहेत हि खरोखरच अभिमानाची अशीच बाब म्हणावी लागेल.
कुर्बानी अर्थात प्राणी त्याची रक्कम जर गरीब , अनाथ, विधवा ह्यांच्या मदतीसाठी तसेच शिक्षण, विद्यापीठ उभारणे आणि अद्यावत कोरोसारख्या महारोगावर इस्पितळे उभारणे ह्यासाठी जर जमा झाली तर ती खऱ्या अर्थाने कुर्बानी म्हणून संबोधता येईल असे येथे बकरी ईद च्या निमित्ताने म्हणावे असे वाटते.
आजची एक दिवसाची उलाढाल चक्क १ लाख कोटी रुपयांमध्ये कित्येक समाजोपयोगी कायमस्वरूपी वास्तू मदत केंद्रे उभारली जाऊ शकतील आणि जर का हे शक्य झाले तर अल्लाह नक्कीच ह्या कुर्बानीचा स्वीकार करेल असे गौरवाने म्हणावे असं वाटते
(लेखक अल्पसंख्याक शैक्षणिक चळवळीचे संस्थापक तसेच अवयवदान चळवळीतील देशव्यापी कार्यकर्ते आहेत )