‘महेशराव तेवढे MIDC रस्त्याबद्दल एकनाथरावांशी बोला’
सातारा ( महेश पवार):
सातारा येथील देगाव रोडवरील एम आय डी सी येथून जाणारा रोड गेली अनेक वर्षे दूर्लक्षीत असून येथून प्रवास करणाऱ्यांची हाडे झिजली पण रस्ता काय झाला नाही.
जरी सातारा शहरापासून हा रस्ता जवळ असला तरी हा रस्ता कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येत असून अनेक वर्षांपासून हा रस्ता व्हावा म्हणून मागणी करून देखील होत नाही. स्थानिकांची अनेकदा आंदोलने झाली पण प्रशासकीय यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे कंटाळलेल्या जनतेमधून, ‘महेशराव तेव्हढ एकनाथरावाशी बोलून एम आय डी सी चा रस्ता करा की राव’ असा उद्वेगजनक आर्जव स्थानिकांनी आमदार महेश शिंदे यांच्याकडे केले आहे.
आता नागरिकांच्या या मागणीकडे महेश शिंदे नेमके कसे पाहतात, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ना सल्ला देऊन आमदार महेश शिंदे यांना चिमटा काढला जात आहे.