सातारा
राजकीय आकसापोटी जाळले पत्रकाराचे सोयाबीन?
पुसेगाव (महेश पवार) :
विसापूर तालुका खटाव येथील पत्रकार पंकज कदम यांच्या शेतीमधील दोन एकरातील सोयाबीन काढून मळणीसाठी ठेवलेला ढिग शनिवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला यामध्ये एक लाख ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले.
आज ही बातमी सातारा जिल्हा प्रमुख प्रताप जाधव, विभाग प्रमुख मुघटरव कदम यांना समजतात त्यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी केली. किमान दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आल्याचे नजरेस आले. यावेळी त्या विभागातील सर्कल तलाठी यांना फोन केले असता फोन बंद लागले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते ज्यांच्या लेखणीच्या जीवावर विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली जाते अशा पत्रकारांना दबाव आणण्यासाठी समाजातील विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत असून, या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे.
संबंधित विभागाने तात्काळ पत्रकार पंकज कदम यांच्या शेतीमधील या जाळीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार पंकज कदम हे कायम जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतात. असे कितीही आघात झाले तरी त्यांनी खचून न जाता आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक समाजातील प्रलंबित व विकृत लोकांच्यावर आवाज उठवावा, शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहील. असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव यांनी दिला.
https://youtu.be/BzW_CsGsUxE