मडगावात साजरी होणार बिरसा मुंडा जयंती
मडगाव:
राष्ट्रीय आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांची येत्या 15 नोव्हेंबर रोजी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने मडगावातील गोमंत विद्यानिकेतनमध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेत विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (एससी/एसटी) आयोगाचे चेअरमन दीपक करमलकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी परिषदेचे चेअरमन उपासो गावकर, अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी योगिनी आचार्य यांची उपस्थिती होती. करमलकर म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन गणेश गावकर, गोवा खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे चेअरमन अन्तानियो वाझ, हस्तकला ग्रामीण आणि लघुउद्योग महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सुभाष चंद्रा यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात एससी/एसटी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय पदोन्नतीचा मार्ग किंवा राखविता या विषयावर सुदेश गावडे यांचे व्याख्यान होईल. तर बेकायदेशीरित्या मालमत्तांचे हस्तांरणावर जलस्रोत खात्याचे संचालक शंकर गावकर यांचे व्याख्यान होईल.