‘या’ तारखेला होणार झुआरी पुलाचे उद्घाटन
झुआरी नदीवरील (New Zuari Bridge) नव्याने उभारलेला पुल डिसेंबर संपण्यापूर्वी नागरीकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल (PWD Minister Nilesh Cabral) यांनी दिली होती. दरम्यान, पुलाच्या चारपदरी महामार्गाचे येत्या चार दिवसांत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतुकीचा बोजा कमी होणार आहे. त्याशिवाय या महामार्गावरील वाहतूकही सुरळीत होणार आहे. राज्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सर्वांत महत्त्वाचा आहे.
नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक अपेक्षित असल्याने व होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे नव्या झुआरी पुलाचा (New Zuari Bridge) एकमार्ग नाताळपूर्वी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपुर्वी सार्वजनीक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी नवीन झुवारी पुलाची पाहणी केली होती.
झुआरी पुलाच्या (New Zuari Bridge) चारपदरी महामार्गाचे 26 डिसेंबर 2022 रोजी उद्धाटन केले जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा या पुलाचे उद्धाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मिळाली आहे.
नवा झुआरी पुलाचा (New Zuari Bridge) एकमार्ग खुला झाल्यास तो पणजीत येणाऱ्या वाहांनासाठी असेल, तर जुना झुआरी पूल हा वास्को व मडगावकडे जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. या पुलावरून अवजड वाहनेही जातील मात्र नव्या पुलावरून या वाहनांना जाण्यास सध्या तात्पुरती बंदी ठेवण्याचा विचार संंबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.