‘त्या’ युवकाच्या मृत्यूनंतर ‘शिवसागर’तील बेकायदेशीर बोटिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर !
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बामनोली येथील मावशी गावाजवळ एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला , दरम्यान या युवकांचा पोहताना बुडून मृत्यू झाला की स्कूटर बोट वरून पडून झाला यावरून परिसरात वादळ निर्माण झाले.
बामणोली परिसरात असलेल्या म्हावशी गावच्या खालील बाजूस असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशया लगत पार्टी साठी काही युवक एका हॉटेलमध्ये मध्ये आले असताना सायंकाळी सहा नंतर स्कुटर बोट वरून पडून त्या युवकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी परिसरात पसरली परंतु कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटींग ला परवानगी नसल्याने कारवाई च्या भितीने संबंधितांनी हा युवक पाण्यात पोहताना बुडाला असल्याची माहिती पोलिसांना दिली असल्याची जोरदार चर्चा परिसरात असून, घटनास्थळी हॉटेल चालकाने पुरावे देखील नष्ट केल्याचे दिसून येते, तर हॉटेल मालकांच्या मुलाची पत्रकारांना भाईगिरी करत दमदाटी करत असल्याचा प्रकार समोर आला , यामुळे आता पोलीसांना तपासात पुढे काय निष्पन्न होते हे देखील पहावं लागेल .
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बोटिंगचा मुद्दा पुन्हा पर्यटकांच्या सुरक्षेवरून ऐरणीवर , परिसरात शेकडो बोटी बेकायदेशीर फिरत असून या बेकायदेशीर बोटिंग संदर्भात जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.