google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘कॉंग्रेसने लोकशाही हक्क कधीच दडपले नाहीत’

पणजी :

म्हादई नदीच्या पाणी वळवण्याच्या मुद्द्यावरून निषेध रॅलीची परवानगी मागे घेतल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ असे संबोधून त्यांच्या कृत्याचा निषेध केला. लोकांच्या निषेधाच्या अधिकाराची पायमल्ली चालविल्याची टीका त्यांनी केली.


चोडणकर पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने १९८० पासून चांगले आणि प्रभावी प्रशासन करताना अनेक आक्रमक आंदोलनांना तोंड दिले. ज्यामध्ये विविध विद्यार्थी आणि कामगार संघटनांचे आंदोलन, आदिवासी, रेंदेर, पारंपरिक मच्छीमार, मोटार सायकल पायलट, कोकणी आंदोलन, कोकण रेल्वे, नायलॉन ६६, प्रादेशिक योजना २०२१ साठी गोवा बचाओ अभियान, अँटी मेटा स्ट्रिप आणि इतर अनेक. मात्र, काँग्रेस सरकारने जनतेचे लोकशाही हक्क कधीही दडपले नाहीत.



चोडणकर म्हणाले, “आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेने एकत्र जमण्याचा, निदर्शने, आंदोलने आणि जाहीर सभांद्वारे सरकारच्या कृतीवर आक्षेप घेण्याचा, सतत निषेध आंदोलने सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु भाजप नागरिकांच्या या अधिकाराचे उल्लंघन आणि दडपशाही करत आहे.”


भाजप गोमंतकीया जनतेचे हक्क का दडपत आहे? भाजपचा गांधीवादी विचार आणि सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय राज्यघटनेने मान्य केलेल्या लोकशाही भावनेवर अविश्वास आहे का?, असा सवाल चोडणकर यांनी केला.

चोडणकर म्हणाले की, संविधानाचा आत्मा जपण्यासाठी आणि नागरिकांना सक्षम करण्यासाठी भाजपने काँग्रेस पक्षाकडून शिकले पाहिजे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!