सरकार कर्जमाफी करतंय; पण शेतकऱ्यांचे पैसे सचिवच लाटतोय?
सातारा जिल्ह्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या संलग्न असलेल्या केडरच्या सचिवांनी सातारा जिल्ह्यातील अनेक विकास सेवा सोसायट्या मध्यें लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचं उघड झाले आहे. आत्ता नव्याने बावधन , आबेघर भोगवली येथील गैरकारभारांची दखल घेत त्याच्यावर निबंधकानी गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्हा बॅकेशी संलग्न असलेल्या केडर सचिवांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना हताशी धरून शेतकऱ्यांच्या नावाने बोगस सह्या करून बोगस कर्ज काढली एवढ्यावरच न थांबता शासनाने केलेल्या कर्ज माफीत सुध्दा खोटी कागदपत्रे दाखवून कर्ज माफीत देखील महा घोटाळा केला असल्याचं समोर आलं आहे . एकीकडे सरकार शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्ज माफीच्या योजना राबविते मात्र सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील सचिवांनी शेतकरयांना कर्जबाजारी केल्याचे समोर आले असून सातारा जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून चालणाऱ्या विकास सेवा सोसायट्या मधील घोटाळा उघड झाला आहे.
आता मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेतायत आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सचिव आणि जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांची चौकशी करणार का ? असा सवाल जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आता करु लागला आहे .
सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सचिवांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता शेतकरी आवाज उठवायला लागलेत यामध्ये कण्हेर खेड , सोनगाव, रानगेघर, दापवडी, अंबेघर भोगवली, बावधन, येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर सचिवांनी बोगस कर्ज काढून कसं कर्जबाजारी केलं आणि शेतकऱ्यांना कसं अडचणीत आणलं हे दाखवून दिले. मात्र हे सगळं होत असताना , जिल्हा बॅंक मात्र एक शब्द काढायला तयार नाही , ज्या बॅकेचा मालकच शेतकरी आहे आणि त्याच शेतकऱ्यांनी निवडून दिलेले संचालक मंडळ आणि बॅंकेचे प्रशासक मात्र कारवाई करत नसल्याने सचिवांनी केलेल्या भ्रष्टाचारात बॅंकेच्या अधिकारी आणि संचालकांचे हाथ असल्याने एवढं प्रकरण घडूनसुध्दा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील आणि प्रशासन गप्प आहे.