… हे तर विरोधी पक्षनेत्यांचे नाटक : सभापती
वीजदरवाढीवरून आक्रमक होत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि काँग्रेसच्यावतीने मेणबत्तीच्या उजेडात पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी हा प्रकार म्हणजे नाटक असल्याची टीका केली आहे.
याबद्दल त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली कि, सवंग लोकप्रियतेसाठी विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी मेणबत्तीच्या उजेडात पत्रकार परिषद घेण्याचे नाटक केले. विधानसभा संकुल उभारल्यानंतर देखभाल दुरुस्तीचे मोठे काम झालेच नव्हते. विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयापासून त्याची सुरवात केली याची खरे तर स्तुती करायला हवी होती. वीज नाही. गैरसोय आहे याची माहिती असतानाही तेथेच पत्रकारांना संबोधित कऱण्याचा अट्टहास त्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठीच धरला. विधानसभा संकुलात अनेक परिषद सभागृहे आहेत. त्याचा वापर त्यांना करता आला असता.