मित्राची बायको असल्याने आमदारांनी दिला कारवाईला नकार?
बेकायदेशीर क्रशरविरोधात वाईकर आक्रमक.....
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगाव ,व्याहळी येथे क्रशर वरून चांगलाच वाद पेटला असून या परिसरातील लोकांचा सुरुवातीपासूनच या क्रशरला विरोध पहायला मिळतो , खरंतर हा परिसर बफर झोन मध्ये येत असुन निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. परंतु या क्रशर मुळे या परिसरातील जैवविविधता तसेच परिसरातील शेती धोक्यात आली आहे , तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं येथील संस्थानिकांचे म्हणणं आहे. एवढेच नव्हे संबंधित क्रशर चालकाने येथील ओढ्याचे प्रवाह बदलले आणि खोटी कागदपत्रे तयार करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दांडगाई ने हा क्रशर सुरू केला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या सर्व प्रकाराबद्दल वाईच्या स्थानिक आमदारांकडे तक्रार केली असता आमदारांनी संबंधित क्रशर चालक मित्रांची बायको असल्याने या प्रकरणी लक्ष घालु शकत नसल्याचे सांगितले, असल्याचे ग्रामस्थांनी राष्ट्रमत सोबत बोलताना सांगितले.
दरम्यान स्थानिकांनी आमदारांनी क्रशर चालकांची पाठराखण केल्याने खरमरीत शेलक्या शब्दात समाचार घेत म्हणाले आमदार आलं तेव्हा चिखल फेक करून झाले पसार, ती त्याच्या मित्रांची बायको सख्खी वशी,नाक बशी त्यांची कोण आपण कश्याला बघायला गेलो .
आमदार मकरंद पाटील यांनी ग्रामस्थांच्या विरोधात भूमिका घेतल्याने येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे, एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाने दबावाखाली काम करु नये अन्यथा येत्या काही दिवसांत सर्व ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेतील व सामुदायिक आत्मदहन करतील यास सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन आणि आमदार असतील असा इशारा आंदोलन स्थळी ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी ग्रामस्थांनी आमदार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली , या सर्व प्रकाराबद्दल आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी स्थानिकाशी संवाद साधला नेमकं काय म्हणाले स्थानिक पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून…
एकुणच घडलेल्या प्रकाराबाबत व झालेल्या आरोपांबाबत वाईचे तहसीलदार व प्रांत यांच्याकडे माहिती घेण्यासाठी गेलो असता संबंधित अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगितले, तसेच वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याशी देखील संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे जिल्हा प्रशासन व आमदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.