‘भविष्यात चित्रपट निर्मितीमध्ये एआय मोठी भूमिका बजावेल’
पणजी येथील कला अकादमी येथे 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज “कृत्रिम प्रज्ञेमुळे चित्रपट निर्मिती कायमचे बदलेल का?” या शीर्षकाच्या विषयाअंतर्गत पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या पॅनेलमध्ये भारतीय चित्रपट निर्माते आणि उद्योजक आनंद गांधी, ‘ओपन एआय’च्या सार्वजनिक धोरण आणि भागीदारी प्रमुख प्रज्ञा मिश्रा, आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा सहभाग होता.
सत्राची सुरूवात शेखर कपूर यांच्या टिप्पणीने झाली. ते म्हणाले की, कृत्रिम प्रज्ञेची (एआय) समज अजूनही विकसित होत आहे. “एआय म्हणजे काय हे कोणालाच माहीत नाही, आम्ही अजूनही मशीन लर्निंग, डीप लर्निंग यांसारख्या विविध एआय संज्ञा शोधण्याच्या प्रक्रियेत आहोत., असे सांगून त्यांनी आपल्या घरामध्ये येणा-या मदतनीसबद्दल एक मनोरंजक वैयक्तिक अनुभव सामायिक केला. ‘मिस्टर इंडिया’च्या सिक्वेलची पटकथा तयार करण्यासाठी आपल्याला, एआयचा वापर करण्यासाठी सुरूवातीला प्रभावित केले होते, तंत्रज्ञानाकडे मानवी क्षमता वाढवण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे डिजिटल क्रांतीमध्ये पेमेंटसाठी यूपीआय मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले आहे, असा वापर एआयचा झाला तर चांगलेच आहे.
एसओआरएचे प्रात्यक्षिक: एआय वापरून ‘टेक्स्ट-टू-व्हिडिओ’ मॉडेल:
प्रज्ञा मिश्रा यांनी यावेळी एसओआरए चे प्रात्यक्षिक यावेळी दाखवले. एक एआय -चालित टेक्स्ट -टू-व्हिडिओ मॉडेल सादर केले. यामध्ये वापरकर्त्यांना मजकूर प्रॉम्प्ट्समधून व्हिडिओ तयार करण्यास अनुमती देते. प्रज्ञा मिश्रा यांनी यावेळी स्पष्ट केले की, सोप्या सूचनांसह, एसओआरए मानवी अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक बारकावे यांचे गुंतागुंतीचे तपशील तयार करून अत्यंत वास्तववादी व्हिडिओ तयार करू शकते.
चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि वांशिक भेदभाव यासारख्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी मॉडेलमध्ये सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाचे चेहरे प्रतिबंधित आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी साधनांच्या सभोवतालच्या नैतिक विचारांना देखील संबोधित केले. एआय सर्जनशील क्षमता ‘अनलॉक’ करू शकते आणि मानवतेसाठी एक शक्तिशाली साधन बनू शकते त्यातून जागतिक स्तरावर निर्माते आणि वापरकर्त्यांना फायदा होऊ शकतो, यावर प्रज्ञा मिश्रा यांनी भर दिला.
एआयचे लोकशाहीकरण: निर्मात्यांना सक्षम बनवणे आणि जागतिक प्रदर्शन:
चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम प्रज्ञेच्या वाढत्या भूमिकेबद्दल विचारले असता, आनंद गांधी यांनी ठळकपणे सांगितले की, कृत्रिम प्रज्ञा लवकरच चित्रपट निर्मिती प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनेल. त्यांनी ठामपणे सांगितले की एआय केवळ मदत करणार नाही तर चित्रपट तयार करण्यात सह-लेखक म्हणून सक्रियपणे सहभागी होईल.
प्राचीन संहितांची पुनर्निर्मिती करण्याच्या एआयच्या संभाव्यतेबद्दल, प्रज्ञा मिश्रा यांनी पुष्टी केली की, हे आधीच घडत आहे आणि त्यांनी अशा साधनांद्वारे लोकशाहीकरण करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. एआय निर्मात्यांना कल्पना तयार करण्यात आणि निधी सुरक्षित करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे दिग्दर्शकांना त्यांचे कार्य जागतिक स्तरावर नेता येवू शकेल, असेही ते म्हणाले.
या चर्चेनंतर एआयच्या मानवी सर्जनशीलतेला रोखण्याच्या संभाव्यतेबद्दलच्या चिंता व्यक्त करण्यात आली. यावर शेखर कपूर म्हणाले, “एआयला मानवी कल्पनेला पकडण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे कारण मानवी कल्पनाशक्तीचा जन्मच अनिश्चितता, प्रेम, भीती यातून होतो, परंतु एआयसाठी सर्वकाही निश्चित आहे”.
शेखर कपूर, म्हणाले की, जर विचार करणे थांबवण्याची आणि एआयला सर्वकाही आउटसोर्स करण्याचे जडत्व आपल्यात असेल, तर ते जन्मजात आहे आणि ती एक मानवी समस्याच आहे.
प्रज्ञा मिश्रा यावेळी म्हणाल्या एआयला बदलण्याऐवजी सर्जनशील अभिव्यक्तीला समर्थन देणारे साधन म्हणून तयार करून प्रतिसाद दिला पाहिजे. “आपण तसा विचार करू शकतो आणि एआय वापरून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो.’’ त्या पुढे म्हणाल्या की, एआय मानवी कल्पनांना जिवंत करण्यात मदत करण्यासाठी एक बुद्धिमान सहाय्यक म्हणून काम करते. त्यांनी स्पष्ट केले की, त्याच प्रॉम्प्टसह देखील, एसओआरए प्रत्येक वेळी अद्वितीय परिणाम निर्माण दाखवते. अगदी मानवांप्रमाणेच, जे प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने अर्थ लावतो.
सत्राचा समारोप सकारात्मक टिपणीवर झाला, पॅनेलने सहमती दर्शवली की कृत्रिम प्रज्ञा चित्रपट निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ करू शकते, परंतु ते मानवी मनाच्या सर्जनशील क्षमतेची कधीही जागा घेणार नाही.