
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताह
अशोका कन्स्ट्रक्शन व सातारा केमिस्ट असोसिएशन यांचा उपक्रम
सातारा (महेश पवार) :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आठ फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक अशोका कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर संजय मोरे व सातारा केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याची माहिती संजय मोरे व केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
संजय मोरे पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यातील ४२९० लोकांना आरोग्यदायी किटचे वाटप करण्यात येणार आहे सातारा शहरांमध्ये मतिमंदांच्या 22 शाळा 33 आश्रम शाळा व १५ शासकीय वस्तीग्रह 23 वृद्धाश्रम असून या सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या या शिबिरातून जाणून घेतल्या जाणार आहेत या उपक्रमाचा शुभारंभ वळसे येथील एहसास या मतिमंद मुलांच्या शाळेतून होणार आहे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व महसूल यंत्रणेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
या आरोग्य शिबिरामध्ये मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे मुलांना आरोग्यदायी सप्ताह निमित्त आवळा पावडर प्रोटीन पावडर गुलकंद इत्यादी साहित्यांचे किट दिले जाणार आहे मुलांच्या तपासणीमध्ये हेपेटाइटिस रक्त तपासणी तसेच शहराच्या इतर आजारात संदर्भातील माहिती घेऊन त्यांना योग्य ते उपचार भविष्यात दिले जातील असे प्रवीण पाटील यांनी सांगितले याशिवाय
सातारा जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींसाठी दर महिना वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1647 युवतींना होणार आहे याशिवाय सातारा जिल्हा व शहरात या विकासाच्या समस्या असतील त्या समस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असे आश्वासन संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिले कोविड काळामध्ये आई-वडील गमावलेल्या 33 मुलांना माहिती घेऊन योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले