google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

दृष्टी जीवरक्षक कंत्राटाची न्यायालयीन चौकशी करा : अमरनाथ


मडगाव :

बाणावली येथे स्थानिक मच्छिमार पेले यांनी रशियन पर्यटकाला बुडताना वाचवून दृष्टी जीवरक्षक कंत्राटदाराचा कामचुकारपणा उघड केला आहे. सदर पर्यटक बुडत असताना जीवरक्षक कुठे होते? पर्यटन खात्याच्या दृष्टी लाइफगार्ड सर्व्हिसेसच्या कंत्राटाची  न्यायालयीन चौकशी करा अशी आमची मागणी काँग्रेस माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

स्थानिक मच्छिमार पेले यांनी बाणावली समुद्रकिनारी एका रशियन पर्यटकाला बुडताना वाचवल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी लाइफगार्ड कंत्राटदारावर कारवाई न केल्याबद्दल भाजप सरकारला जबाबदार धरले.

सरकारने मार्च 2020 पासून मार्च 2024 पर्यंत जीवरक्षक कंत्राटावर 226.83 कोटी खर्च केले आहेत. याच कालावधीत गोव्यात 56 जणांचे बुडून मृत्यू झाले आहेत. यावरून कंत्राटदार आपले कर्तव्य बजावत नसल्याचे दिसून येते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

बीच सेफ्टी कॉन्ट्रॅक्टर वारंवार दावा करतात की जीवरक्षक जीव वाचवत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दृष्टीच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी पर्यटन विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही. कंत्राटदार बोगस दावे करत आहेत, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

लोकांचा बुडून मृत्यू होतो तेव्हा जीवरक्षक तेथे उपस्थित का नसतात? जीवरक्षकांच्या कामाच्या वेळेत म्हणजे दिवसा उजेडात अनेक जणांचे बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

गोव्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर  356 हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्र केल्याचा दावा दृष्टी करते. मात्र, स्थानिक पोलिस स्थानकांत अशा प्रकारची एकही घटना नोंदवली जात नाही. यावरून दृष्टी बोगस दावे करत असल्याचे वास्तव उघड होते, असे अमरनाथ पणजीकर यांनी निदर्शनास आणून दिले.

पर्यटन विभागाच्या तपासणी अहवालातून असे दिसून आले आहे की दृष्टीच्या टॉवर्समध्ये बचाव उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य जागाच नाही. स्विम झोनवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. आवश्यक  तरतुदींनुसार जेट स्कीची नोंदणी झालेली नाही. कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर कोणतेही सीमांकित जलतरण क्षेत्र नाहीत, असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

पर्यटन खात्याचे जीवरक्षक कंत्राट हा मोठा घोटाळा असून, भाजपला कंत्राटदाराकडून निधी मिळत असल्यानेच सरकार त्यांच्यावर कारवाई करीत नाही असा अमरनाथ पणजीकर यांनी आरोप केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!