सेक्स रॅकेटप्रकरणी ‘त्या’ दोन रिसॉर्टचे परवाने रद्द होणार..?
हणजुणे पोलिसांनी कथित सेक्स रॅकेट सुरू असलेल्या दोन रिसॉर्ट्सचे परवाने रद्द करण्यासाठी पर्यटन विभागाला पत्र लिहिले आहे. उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांनी दोन्ही रिसॉर्ट्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्यात ही रिसॉर्ट का बंद करू नयेत, असे विचारले आहे.
अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा, 1956 च्या कलम 18 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस जारी करताना, एसडीएम गुरुदास देसाई म्हणाले की, हणजुणे पोलिस निरीक्षक (पीआय) यांनी जॉली जॉली लेस्टर, वागातोर आणि आणि कॉसमॉस अॅट ग्रीनस्पेस हॉटेल बामनवाड्डो येथील मायोर रोमा रिसॉर्टवर छापा टाकला होता.
शिवोलीतून 7 सप्टेंबर रोजी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या काही तरूणींची सुटका केली होती. छाप्यादरम्यान पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन आरोपींनाही अटक केली होती.
एसडीएम पुढे म्हणाले की, हणजुणे पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की, दोन्ही रिसॉर्ट्स आरोपींनी वेश्यालय म्हणून वापरले होते आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा, 1956 च्या कलम 18 अंतर्गत परिसर बंद करण्याची विनंती केली होती. या प्रकरणाची सुनावणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी म्हणाले की, “पोलिसांनी या अवैध वेश्याव्यवसाय रॅकेटची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही दोन्ही रिसॉर्ट्सचे परवाने रद्द करण्यासाठी पर्यटन विभागाला पत्र लिहिले आहे.