मातृभाषा दिनी भाई मावजो आणि महाबळेश्वर सैल यांच्यासोबत ‘भास संवाद’
कोंकणी भाषा मंडळ, गोवा तर्फे यंदा जागतिक मातृभाषा दिनानिमित्त ‘भास-संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळ नामवंत लेखकां सोबत तरुण आणि अभ्यासक यांच्यातील विशेष संवाद घडवून आणणार आहे. दरवर्षी हा कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिनी आयोजित केला जाणार आहे. यंदा या कार्यक्रमाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय लेखक श्री. दामोदर मावजो आणि सरस्वती पुरस्कार प्राप्त प्रसिध्द भारतीय लेखक श्री. महाबळेश्वर सैल सोबत संवाद आयोजित केला आहे. हा कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता कॉन्फरन्स हॉल, रवींद्र भवन, मडगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना या नामवंत साहित्यिकांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला गोव्यातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील विविध शाळांमधील शिक्षकही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मंडळाने सर्व शाळांना निमंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांनी केले आहे. कार्यक्रम लोकांसाठी खुला आहे.
अधिक माहितीसाठी ब्रिजेश शेट देसाय (9673453367) किंवा अभिजीत पागी (9545338713) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या समारंभात मंडळाचे शैक्षणिक पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत कोंकणी विषयात सर्वाधिक गुण मिळवणारी लॅकेंझिया फर्नांडिस, दक्षिण गोव्यात दहाविच्या परिक्षेंत कोंकणी विषयात सर्वाधिक गुळ मिळवणारे दृश्टी विनोद गांवकार, निधी कपिल पै वैद्य, भुमी राजेंद्र गोसावी, डॅरिल फिलिप ल्यूक डिसोझा, पलिया दत्तप्रसाद सिनाय अग्नी, श्रेया परेश भट आणि बारावीच्या परिक्षेंत कोंकणी विषयात सर्वाधिक गुळ मिळवणारे दिया गौतम सावर्डेकार, नेहा संजीव सिनाय भांगी, रविना अर्जुन वेळीप, शर्वा चोडणकर आणि बी.ए. परीक्षेत कोकणी विषयात सर्वाधिक गुण मिळवल्या बद्दल एन्ड्रिया साविया बाप्तिस्ता आणि एमए परीक्षेत कोंकणी विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल काजल महेश नायक यांना गौरविण्यात येणार आहे. शर्वरी शेट करमळकार, दिपांक्षा गांवकार, हार्दिक राणे, शुभांगी गांवकार, खुशी प्रभुदेसाय, प्रिया लवंदे आणि शर्वा चोडणकार यांना स्वर्गीय पद्मजा माणिकराव गावणेकार शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. कोकणी अनुवादक आणि कार्यकर्ते माणिकराव गावणेकार यांनी ही शिष्यवृत्ती प्रायोजित केली आहे.