google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

घटक राज्य दिनावरून काँग्रेसचा सरकारवर निशाणा 

पणजी :

सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये “गोवा घटक राज्य दिन” जाहिरात प्रसिद्ध करू न शकलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर टीका करत, सरकारी जाहिरातीत घटक राज्य दिनाच्या अधिकृत कार्यक्रमाचा उल्लेखच नाही. गोव्याला भारताचे 25 वे राज्य म्हणून समावेश केल्याचे श्रेय काँग्रेसला मिळणार म्हणून भाजप सरकारने घटक राज्य दिन साजरा केला नाही असा गंभीर आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोव्याच्या काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये माहिती आणि प्रसिद्धी खात्याने प्रसिद्ध केलेल्या छोट्या आकाराच्या जाहिरातींवर प्रतिक्रिया देताना अमरनाथ पणजीकर म्हणाले की, दिवाळखोर व भ्रष्ट  सरकारकडे गोवा घटक राज्य दिन साजरा करण्यासाठी पैसे नाहीत पण मिशन टोटल कमिशनसाठी इव्हेंट आयोजनावर करोडो रुपये खर्च केले जातात.

गोवा सरकारने  गोव्याचे माननीय राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांची उपस्थिती असलेला एकही राज्यस्तरीय अधिकृत कार्यक्रम आयोजीत केला नाही. ओपिनियन पोल दिवस आणि गोवा घटक राज्य दिन काँग्रेसने गोव्याला दिल्याच्या आकसापोटीच या ऐतिहासिक दिवसांकडे भाजप सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर प्रदेशात जाऊन आज भाजपचा प्रचार केला. यावरून त्यांचे प्राधान्य गोवा घटक राज्य दिन साजरा करण्यास नव्हे तर भाजपच्या प्रचाराला असल्याचे दिसून येते, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

काँग्रेस सरकार गोवा घटक राज्य दिनानिमित्त “कला गौरव” पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करत असे आणि गोव्यातील 60 कलाकारांचा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करत असे. दुर्दैवाने, भाजप सरकारने सत्तेत येताच सदर कार्यक्रमाचे आयोजन थांबवीले, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

गोवा घटक राज्य दिन भव्य सोहळ्याने साजरा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गोव्याला मिळालेल्या घटक राज्याच्या दर्जामुळेच गोवा विधानसभेत 40 आमदार आहेत आणि डॉ. प्रमोद सावंत स्वतःला गोव्याचे मुख्यमंत्री म्हणवतात. भारताचे दूरदर्शी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला, याची आठवण अमरनाथ पणजीकर यांनी करुन दिली.

काँग्रेस पक्षाने नेहमीच गोव्यातील जनतेच्या भावनांचा आदर केला आहे. ओपिनियन पोल, कोकणीला राज्य मान्यता, घटक राज्याचा दर्जा हे गोवा राज्यासाठी काँग्रेस सरकारांचे  योगदान आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.

4 जून 2024 रोजी केंद्रात इंडिया आघाडी सरकार सत्तेवर येणार हे निश्चित आहे. काँग्रेस पक्ष सर्व ऐतिहासिक दिवसांचे स्मरण राज्यस्तरीय अधिकृत कार्यक्रमांसह करेल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!