google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

रस्त्यांच्या कामात पारदर्शकता पाळण्याची काँग्रेसची मागणी

पणजी :

रस्ते दुरुस्तीच्या कामात पूर्ण पारदर्शकता आणावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाने आज प्रधान मुख्य अभियंता यांना दिले असून दहा दिवसांत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्वाक्षरी केलेल्या तीन पानी निवेदनात रस्ता दुरुस्तीच्या कामांचे सर्व तांत्रिक  तपशील सार्वजनिक केले जावेत तसेच रस्त्यांच्या कामादरम्यान गुणवत्ता नियंत्रण तपासणीची मागणीही काँग्रेसने केली आहे.

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे आणि पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी त्यांची नावे सार्वजनिक केली जावीत, असे अमित पाटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

कामाचा आदेश जारी केल्याशिवाय कोणतीही कामे सुरू करू नयेत, असा इशारा काँग्रेसने पीडब्ल्यूडीला दिला आहे. सर्व वर्क ऑर्डरमध्ये करण्यात येत असलेल्या कामांचे सर्व तांत्रिक आणि व्यावसायिक तपशील असावेत, असे अमित पाटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याला रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी वर्क ऑर्डर प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे. सदर काम कोण करत आहे हे लोकांना कळण्यास त्यामूळे मदत होणार असून, कंत्राटदाराला जबाबदार धरण्यास मदत होईल असे म्हटले आहे.

काँग्रेसने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे साबाखाचे अभियंते आणि अधिकारी यांनी रस्त्यांची कामे केलेल्या ठिकाणी सतत उपस्थित राहून कामाचा दर्जा तपासावा अशी मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!