google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा डाव फसला…

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा काही राजकीय नेत्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला असून, गोव्यातील स्थानिक नेतृत्वाने खंबीर भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनीही पक्ष नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे.

उत्तर व दक्षिण गोव्याचे लोकसभा निवडणुक उमेदवार काँग्रेसनेच ठरवावे असे एका बाजूने सांगून दुसरीकडून ठरावीक उमेदवारांची नावे सदर बिगर काँग्रेस राजकीय नेत्यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे पाठवली. परंतु, यामागे काही काळेबेरे असल्याचा सुगावा लागल्याने काँग्रेसच्या केंद्रिय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ गटनेत्यांकडे चर्चा केल्याने हे कारस्थान उघडकीस आल्याने खास सूत्रांकडून समजते.

दक्षिण गोव्यात हिंदू उमेदवार जिंकू शकतो असे मत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे राज्यातील स्थानीक पक्षाच्या एका महत्वाकांक्षी नेत्याने व्यक्त केले होते. सदर नेत्याने इंडिया आघाडीतील इतर दोन पक्षाच्या अध्यक्षांकडूनही ठाकरेंकडे सदर निरोप पाठवला होता असे आता उघड झाले आहे.

उत्तर गोव्यातून निवडणुक लढविण्याचा अर्जही न भरलेल्या एका काँग्रेस पदाधिकाऱ्याचे नाव ऐनवेळी पूढे करुन तेथेही काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. परंतु, स्थानिक काँग्रेस नेत्यांनी हायकमांडकडे शिफारस केलेली नावेच उमेदवारीसाठी विचारात घ्यावीत अशी भूमिका घेतल्याने काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा डाव फसला असे सूत्रांकडून कळले.

दक्षिण गोव्यात काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवारी दिल्यास विजय नक्की असल्याचे माहित असल्यानेच तसेच आपल्या मतदारसंघात काँग्रेसचे निवडणुक चिन्ह ‘हात’ परत एकदा मतदारांसमोर येणार असल्याने आपल्या पक्षाची निशाणी मागे पडेल या भितीनेच हिंदू उमेदवाराची मागणी करुन एका बाजूने काँग्रेस उमेदवाराचा पराभव करावा व दुसरीकडे अल्पसंख्य लोकांना मतदानासाठी जाण्यापासून परावृत्त करावे व हात चिन्हाचा आपल्या पक्षाच्या निशाणीवर पडणारा प्रभाव टाळावा अशी योजना सदर महत्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी आखल्याचे कळते.

काँग्रेस पक्षातील स्थानीक नेत्यांवर नाहक आरोप करुन अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करण्याचे कारस्थान सदर नेत्यांनी आखल्याचे कळते. त्यातच आज एका वेबवाहिनीवर काँग्रेस हायकंमाडने गोव्यात दोन निरीक्षक पाठविल्याची बातमी पेरून ती राजकीय विश्लेषक, पत्रकार तसेच सामाजीक संघटनांच्या कार्यकर्त्यांना पाठविण्याचे काम एक स्थानीक राजकीय पक्षाचा पदाधिकारी करीत असल्याचे बिंग फुटल्याने सदर पदाधिकाऱ्याचा नेताही अडचणीत आला असल्याचे कळते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!