google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘निष्ठावान कॉंग्रेस कार्यकर्ता भाजप व आरएसएसला कदापी जवळ करणार नाही’

मडगाव :
आरएसएस कार्यकर्ते, आरजी उमेदवार आणि भाजप आमदार नीलेश काब्राल यांचे सहयोगी हे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या कुडचडे येथील “संडे डायलॉग” चा प्रचार कसा करू शकतात? जी व्यक्ती मनाने काँग्रेसमन आहे ती काँग्रेसच्या विचारधारेसाठी खंबीरपणे उभी राहील. कॉंग्रेसची विचारधारा पूर्णपणे भाजप आणि आरएसएस विचारसरणीच्या विरोधात आहे, असे काँग्रेस सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी म्हटले आहे.

कुडचडेचे भाजप आमदार निलेश काब्राल यांना जवळ असलेले पुष्कल सावंत, आरजीचे २०२२ चे विधानसभा निवडणूक उमेदवार आदित्य देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौस्तुभ भिसे तसेच स्थानीक नगरसेवक बाळकृष्ण उर्फ पिंटी होडारकर यांच्या गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी विकास भगत यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थितीवर कॉंग्रेसने सवाल उपस्थित करुन एकंदर “संडे डायलॉग” आयोजीत करण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मी मनापासून काँग्रेस विचारसरणीचा आहे आणि मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सदस्य आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीन. मी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला नाही आणि भाजपच्या नेतृत्वाखालील कोणत्याही सरकारात सहभाग घेतला नाही. मी एक निष्ठावान आणि शिस्तप्रिय काँग्रेस कार्यकर्ता आहे, असे काँग्रेस समाजमाध्यम विभागाचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी म्हटले आहे.

मी काँग्रेस विचारधारेशी कट्टरपणे बांधील असलेली काँग्रेस कार्यकर्ता आहे. गोवा विधानसभेच्या बाहेर आणि आत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या कामगिरीचा मी नेहमीच आदर आणि कौतुक करेन. भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांशी हातमिळवणी करणाऱ्या ज्ञात-अज्ञात शक्तींना विरोध करण्यास मी वचनबद्ध आहे, असे काँग्रेस समाजमाध्यम विभाग समन्वयक शमिला सिद्दिकी यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांच्या कुडचडेतील शनिवारच्या पत्रकार परिषदेत आमदार काब्राल, आरएसएस यांच्याशी जवळीक असलेले उपस्थित होते हे सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेसने काही छायाचीत्रे प्रसिद्ध केली आहेत ज्यात पुष्कल सावंत व कौस्तुभ भिसे हे भाजप व आरएसएसकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काल गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामथ यांनी सदर संडे डायलॉग सर्व ४० मतदारसंघात होणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर कॉंग्रेसला सदर कार्यक्रमाच्या हेतूवरच शंका आली व त्यानंतर लगेच मोरेनो रिबेलो यांनी त्यावर तिखट प्रतिक्रीया दिली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!