जननायकांनी दलित वस्तीचा निधी लाटल्याचा आरोप…
सातारा (महेश पवार):
सरपंच परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या बोपेगावात गावात दलितांच्या लाखोंच्या निधीवर दरोडा.भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी बोपेगावच्या गावकऱ्यांची मान शरमेने खाली गेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या धर्मनिरपेक्ष कारभाराला धक्का पोहचवेलं अशी बाब सातारा सरपंच परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या वाई तालुक्यातील बोपेगाव या गावात घडल्याचे समजते आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील यांनीच दलीत वस्तीच्या नावाखाली हा पुल बांधून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
बोपेगावात दलित वस्ती पूल या नावाखाली काही किलोमीटर कसलीही दलित वस्ती नसताना 27 लाख खर्चून पूल बांधण्यात आला आहे. दलित वस्ती व बांधकाम केलेला पूल यातील वास्तविक अंतर् हे अंदाजे 3.5 किलोमीटर आहे.16/10/2018 बांधकाम सुरु करत मक्तेदार मंगलश्याम कॉन्स्ट्रुकशन यांनी दलित वस्तीतून जाणारा पूल बांधला आहे तसा माहिती दर्शवणारा फलक पुलाची सर्व कहाणी सांगून जातोय.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दलित वस्तीसाठी शासनाकडून मंजूर योजनेचा लाभ घेणारी वस्ती जवळपास कित्येक किलोमीटर पर्यंत नसल्याचे लक्षात आले आहे. दलितांच्या हक्काचा निधी पळवणारे बोपेगावमधील खरे दळभद्री कोण याचा तपास होणे गरजेचे आहे. सर्वात मोठा विश्वासघात हा प्रशासनाने केला असून, या सर्व प्रकरणात बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे संबंधित अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे .
या आरोपांबाबत आ. मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही …