
पणजी: गोव्याच्या शहरी विकास आणि ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आढावा बैठक सोमवार (दि. 12) रोजी पार पडली. या बैठकीत गोव्यातील ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
खट्टर म्हणाले, “गोव्याने इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली आहे, याबद्दल मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं अभिनंदन करतो. गोव्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. राज्यानं प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनाची आम्हाला माहिती दिली आहे आणि ही योजना नक्कीच पुढे नेली जाईल याची मला खात्री आहे.”