google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

१ रोजी आपची स्वराज्य यात्रा

सातारा :

आम आदमी पार्टीच्या वतीने सामान्य माणसांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सातार्‍यात एक जून रोजी येत असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे सरदार (सागर) भोगांवकर व सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रतन पाटील, सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे, कायदा विभागाचे सचिव मंगेश महामुलकर आदी उपस्थित होते.

भोगांवकर पुढे म्हणाले, पंढरपूर ते रायगड अशी आम आदमी पार्टीच्या वतीने 28 मे ते 6 जून स्वराज्य यात्रा काढण्यात आली असून ती महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ही यात्रा एकूण दहा दिवस चालणार असून 782 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.

आम आदमी पार्टीला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जनाधार तयार करणे, लोकांना भेडसावणार्‍या समस्यांना वाचा फोडणे, सध्याच्या काळातील सत्तेमधील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करणे ही आम आदमी पार्टीची उद्दिष्टे असून त्या उद्दिष्टांच्या प्रसारासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे भोगावकर यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया, रंगा राचुरे, धनंजय शिंदे, विजय कुंभार, अजिंक्य शिंदे, संदीप देसाई यात्रेत सहभागी होणार आहेत.


सातारा शहरात ही यात्रा एक जून रोजी सायंकाळी पाच वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून शहरात येणार आहे. या यात्रेचे स्वागत होऊन सातार्‍यात आम आदमी पार्टीच्या वतीने रॅली काढण्यात येणार आहे. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचा जनाधार निर्माण करणे आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या तयारी करणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

28 मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने सुरू झालेल्या या स्वराज यात्रेची सांगता 6 जून रोजी रायगड येथे होणार आहे. महाराष्ट्रातील वाढता भ्रष्टाचार, दडपशाही यांच्यावर आवाज उठवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!