HDFC च्या महसुलात तब्बल ‘इतकी’ झाली वाढ…
एचडीएफसी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने शनिवार २० जुलै २०२४ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी बँकेच्या (भारतीय जीएएपी) निकालांना मान्यता दिली. बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे खात्यांचे ‘लिमिटेड रिव्ह्यू’ म्हणजेच मर्यादित पुनरावलोकन करण्यात आले.
एकत्रित आर्थिक निकाल:
बँकेचा एकत्रित निव्वळ महसूल ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ३५०.७ बिलियनवरून ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी १०६.५ टक्क्यांनी वाढून रु. ७२४.२ बिलियनपर्यंत पोहोचला. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी एकत्रित करोत्तर नफा रु. १६४.७ बिलियन होता, ज्यामध्ये ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीच्या तुलनेत ३३.२ टक्क्यांची वाढ झाली. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी प्रतिशेअर उत्पन्न रु. २१.७ होते आणि ३० जून २०२४ रोजी प्रतिशेअर बूक मूल्य रु. ६२५.४ होते.
स्वतंत्र आर्थिक निकाल:
नफा व तोटा खाते: ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेली तिमाही
बँकेचा निव्वळ महसूल ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ३२८.३ बिलियनवरून ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी २३.४ टक्क्यांनी वाढून रु. ४०५.१ बिलियनपर्यंत पोहोचला.
निव्वळ व्याज उत्पन्न (कमी व्याजदरासह मिळवलेले व्याज) ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. २३६.० बिलियनवरून ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी २६.४ टक्क्यांनी वाढून रु. २९८.४ बिलियनपर्यंत पोहोचले. मूळ निव्वळ व्याज मार्जिन एकूण मालमत्तांवर ३.४७ टक्के आणि व्याज मिळकत मालमत्तांवर ३.६६ टक्के होते.
३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी इतर उत्पन्न (व्याज नसलेले महसूल) रु. १०६.७ बिलियन होते, जे तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या संबंधित तिमाहीमध्ये रु. ९२.३ बिलियन होते. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी इतर उत्पन्नाचे चार घटक म्हणजे फीज व कमिशन्स रु. ७०.५ बिलियन (मागील वर्षाच्या संबंधित तिमाहीमध्ये रु. ६२.९ बिलियन), परकीय चलन व डेरिव्हेटिव्ह्ज महसूल रु. १४.० बिलियन (मागील वर्षाच्या संबंधित तिमाहीमध्ये रु. १३.१ बिलियन), निव्वळ व्यापार व मार्क टू मार्केट नफा रु. २.२ बिलियन (मागील वर्षाच्या संबंधित तिमाहीमध्ये रु. ५.५ बिलियन नफा) आणि वसुली व लाभांशासह इतर विविध उत्पन्न रु. २०.१ बिलियन (मागील वर्षाच्या संबंधित तिमाहीमध्ये रु. १०.८ बिलियन).
३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी कार्यसंचालन खर्च रु. १६६.२ बिलियन होता, जो मागील वर्षाच्या संबंधित तिमाहीतील रु. १४०.६ बिलियनच्या तुलनेत १८.२ टक्क्यांनी वाढला. या तिमाहीसाठी खर्च-ते-उत्पन्न गुणोत्तर ४१.० टक्के होते.
३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी प्रोव्हिजन्स व कॉन्टिन्जेंसीज ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. २८.६ बिलियनच्या तुलनेत रु. २६.० बिलियन होते.
एकूण क्रेडिट खर्च गुणोत्तर ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी ०.७० टक्क्यांच्या तुलनेत ०.४२ टक्के होते.
३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी करपूर्व नफा (पीबीटी) रु. २१२.८ बिलियन रूपये होता. तिमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीमधील पीएटीच्या तुलनेत ३५.३ टक्क्यांनी वाढून रू. १६१.७ बिलियनपर्यंत पोहोचला.
ताळेबंद: ३० जून २०२४ रोजीचे
३० जून २०२४ रोजी एकूण ताळेबंद आकार रु. ३५,६७२ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी रु. २५,०१७ बिलियन होता.
एकूण ठेवी ३० जून २०२४ रोजी रु. २३,७९१ बिलियन होत्या, ज्यामध्ये ३० जून २०२३ रोजीच्या ठेवींच्या तुलनेत २४.४ टक्क्यांनी वाढ झाली. सीएएसए ठेवी ६.२ टक्क्यांनी वाढल्या, ज्यामध्ये बचत खाती ठेवी रु. ५,९६४ बिलियन आणि चालू खाती ठेवी रु. २,६७३ बिलियन होत्या. मुदत ठेवी रु. १५,१५४ बिलियन होत्या, ज्यामध्ये मागील वर्षाच्या संबंधित तिमाहीमधील ठेवींच्या तुलनेत ३७.८ टक्के वाढ झाली. ज्यामुळे ३० जून २०२४ रोजी सीएएसए ठेवी एकूण ठेवींच्या ३६.३ टक्के होत्या.
बँकेच्या सरासरी ठेवी जून २०२४ तिमाहीसाठी रू. २२,८३१ बिलियन होत्या, ज्यामध्ये जून २०२३ तिमाहीसाठी रू. १८,२४० बिलियनच्या तुलनेत २५.२ टक्क्यांची वाढ झाली आणि मार्च २०२४ तिमाहीसाठी रू. २१,८३६ बिलियनच्या तुलनेत ४.६ टक्क्यांची वाढ झाली.
बँकेच्या सरासरी सीएएसए ठेवी जून २०२४ तिमाहीसाठी रू. ८,१.६ बिलियन होत्या, ज्यामध्ये जून २०२३ तिमाहीसाठी रू. ७,४९५ बिलियनच्या तुलनेत ८.१ टक्क्यांची वाढ झाली आणि मार्च २०२४ तिमाहीसाठी रू. ७,८४४ बिलियनच्या तुलनेत ३.३ टक्क्यांची वाढ झाली.
३० जून २०२४ रोजी एकूण आगाऊ जमा रु. २४,८६९ बिलियन होते, ज्यामध्ये ३० जून २०२३ रोजीच्या आगाऊ जमाच्या तुलनेत ५२.६ टक्क्यांची वाढ झाली. आंतर-बँक सहभाग प्रमाणपत्रे व बिलांच्या माध्यमातून एकूण हस्तांतरणांना पुन्हा सवलत देण्यात आली आणि सिक्युरिटीझेशन / असाइनमेंट, व्यवस्थापनांतर्गत आगाऊ जमा ३० जून २०२३ रोजीच्या तुलनेत ५१.० टक्क्यांनी वाढले. रिटेल कर्जे १००.४ टक्क्यांनी वाढली, व्यावसायिक व ग्रामीण बँकिंग कर्जे २३.० टक्क्यांनी वाढली आणि कॉर्पोरेट व इतर व्होलसेल कर्जे १८.७ टक्क्यांनी वाढली. परकीय आगाऊ जमाचे एकूण आगाऊ जमामध्ये १.५ टक्के योगदान होते.
बँकेची व्यवस्थापनांतर्गत आगाऊ जमा सरासरी आधारावर जून २०२४ तिमाहीसाठी रू. २५,३२७ बिलियन होती, ज्यामध्ये जून २०२३ तिमाहीसाठी रू. १६,४३९ बिलियनच्या तुलनेत ५४.१ टक्क्यांची वाढ झाली आणि मार्च २०२४ तिमाहीसाठी रू. २५,१२५ बिलियनच्या तुलनेत ०.८ टक्क्यांची वाढ झाली.
भांडवल पर्याप्तता:
बेसेल थ्री मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेचे एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीएआर) ३० जून २०२४ रोजी १९.३ टक्के होते (३० जून २०२३ रोजी १८.९ टक्के). यासाठीची नियामक आवश्यकता ११.७ टक्के आहे. टियर १ सीएआर ३० जून २०२४ रोजी १७.३ टक्के होता आणि कॉमन इक्विटी टियर १ कॅपिटल गुणोत्तर ३० जून २०२४ रोजी १६.८ टक्के होते. जोखीम-भारित मालमत्तांचे मूल्य रु. २४,५५६ बिलियन होते.
नेटवर्क
३० जून २०२४ पर्यंत बँकेच्या वितरण नेटवर्कमध्ये ४,०८१ शहरांमधील/नगरांमधील ८,८५१ शाखा व २१,१६३ एटीएमचा समावेश होता, तर तुलनेत ३० जून २०२३ पर्यंत ३,८२५ शहरांमधील/नगरांमधील ७,८६० शाखा व २०,३५२ एटीएमचा समावेश होता. आमच्या ५२ टक्के शाखा अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमध्ये आहेत. तसेच आमचे १५,१४६ व्यावसायिक प्रतिनिधी आहेत, ज्यांचे व्यवस्थापन प्रामुख्याने कॉमन सर्विस सेंटर्स (सीएससी) द्वारे केले जाते. ३० जून २०२४ रोजी कर्मचाऱ्यांची संख्या २,१३,०६९ होती (तुलनेत ३० जून २०२३ रोजी १,८१,७२५).
मालमत्ता दर्जा
३० जून २०२४ रोजी एकूण नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता एकूण आगाऊ जमाच्या १.३३ टक्के होती (कृषी विभागातील एनपीए वगळता १.१६ टक्के), तुलनेत ३१ मार्च २०२४ रोजी १.२४ टक्के होती (कृषी विभागातील एनपीए वगळता १.१२ टक्के) आणि प्रोफॉर्मा विलनीकरणाच्या आधारावर १ जुलै २०२३ रोजी १.४१ टक्के होती (कृषी विभागातील एनपीए वगळता १.२५ टक्के). ३० जून २०२४ रोजी निव्वळ नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता निव्वळ आगाऊ जमाच्या ०.३९ टक्के होती.
उपकंपन्या
बँकेच्या प्रमुख उपकंपन्यांपैकी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. भारतीय जीएएपीअंतर्गत त्यांचे आर्थिक निकाल करतात, तर इतर उपकंपन्या अधिसूचित भारतीय लेखा मानकांनुसार (‘इंड-एएस’) त्यांचे आर्थिक निकाल तयार करतात. खाली नमूद केलेल्या बँकेच्या उपकंपन्यांचे आर्थिक आकडे लागू असलेल्या जीएएएपी अंतर्गत त्यांच्या स्वतंत्र अहवालामध्ये वापरण्यात आलेल्या लेखा (अकाउंटिंग) मानकांनुसार आहेत.
बँकेचा ९४.६ टक्के हिस्सा असलेली एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (एचडीबीएफएसएल) ही नॉन-डिपॉझिट घेणारी एनबीएफसी कंपनी आहे, जी कर्ज व मालमत्ता वित्त उत्पादनांची विस्तृत श्रेणी देते. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी एचडीबीएफएसएलचा निव्वळ महसूल रु. २३.९ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. २३.१ बिलियन होता, ज्यामध्ये ३.२ टक्क्यांची वाढ झाली. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी करोत्तर नफा रु. ५.८ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ५.७ बिलियन होता, ज्यामध्ये २.६ टक्क्यांची वाढ झाली. ३० जून २०२४ रोजी एकूण लोन बुक रु. ९५६ बिलियन होते, तुलनेत ३० जून २०२३ रोजी रु. ७३६ बिलियन होते, ज्यामध्ये ३०.० टक्क्यांची वाढ झाली. स्टेज ३ कर्जे एकूण कर्जांच्या १.९३ टक्के होते. ३० जून २०२४ रोजी एकूण सीएआर १८.८ टक्के होते, तर
टियर-१ सीएआर १४.० टक्के होते.
बँकेचा ५०.४ टक्के हिस्सा असलेली एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. (एचडीएफसी लाइफ) ही भारतातील आघाडीची, दीर्घकालीन लाइफ इन्शुरन्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनी आहे. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी एचडीएफसी लाइफचे निव्वळ प्रमुख उत्पन्न रु. १२८.१ बिलियन होते, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ११६.७ बिलियन होते, ज्यामध्ये ९.७ टक्क्यांची वाढ झाली. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी करोत्तर नफा रु. ४.८ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ४.२ बिलियन होता, ज्यामध्ये १५.० टक्क्यांची वाढ झाली.
बँकेचा ५०.५ टक्के हिस्सा असलेली एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (एचडीएफसी एर्गो) जनरल इन्शुरन्स उत्पादनांची परिपूर्ण श्रेणी देते. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी एचडीएफसी एर्गोने प्राप्त केलेले प्रीमियम (निव्वळ) रु. २१.४ बिलियन होते, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. २०.० बिलियन होते, ज्यामध्ये ६.७ टक्क्यांची वाढ झाली. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी करोत्तर नफा रु. १.३ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. २.० बिलियन होता.
बँकेचा ५२.५ टक्के हिस्सा असलेली एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लि. (एचडीएफसी एएमसी) भारतातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी एचडीएफसी म्युच्युअल फंडसाठी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर (गुंतवणूकदार व्यवस्थापक) आहे आणि बचत व गुंतवणूक उत्पादनांची सर्वसमावेशक श्रेणी प्रदान करते. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी एचडीएफसी एएमसीचे क्वॉर्टली अॅव्हरेज अॅसेटस अंडर मॅनेजमेंट जवळपास रु. ६,७१६ बिलियन होते, ज्यामध्ये ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीच्या तुलेनत ३८.३ टक्क्यांची वाढ झाली. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी करोत्तर नफा रु. ६.० बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ४.८ बिलियन होता, ज्यामध्ये २६.५ टक्क्यांची वाढ झाली.
बँकेचा ९५.२ टक्के हिस्सा असलेली एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड (एचएसएल) भारतातील आघाडीची ब्रोकिंग कंपनी आहे. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी एचएसएलचा एकूण महसूल रु. ८.२ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. ५.० बिलियन होता. ३० जून २०२४ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी करोत्तर नफा रु. २.९ बिलियन होता, तुलनेत ३० जून २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी रु. १.९ बिलियन होता, ज्यामध्ये ५४.६ टक्क्यांची वाढ झाली.