google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

IFBA 2024 मध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीतील मान्यवरांचा सन्मान

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप (GIG) च्या खाद्य आणि जीवनशैली प्लॅटफॉर्म ब्रँड गोदरेज विक्रोळी कुकिनाने फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडिया (FBAI) यांच्या सहकार्याने गोव्यातील ताज हॉलिडे व्हिलेज येथील सेवन रिव्हर्समध्ये इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स 2024 (IFBA) चे आयोजन केले. भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्यपरंपरेचा उत्सव साजरा करत असताना IFBA सातत्याने खाद्य व पाककला उद्योगाला नवीन परिभाषा मिळवून देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा सन्मान करत आहे.

प्रमुख सन्मानार्थीमध्ये शेफ संज्योत कीर यांना आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू द हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इंडस्ट्री हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. कल्याण कर्माकर यांना FBAI स्टार म्हणून नावाजण्यात आले. याशिवाय, विविध क्षेत्रांतील विजेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये फूड रीव्ह्यूअर पृथ्वीश अशर यांना इंस्टा अवॉर्ड फॉर टॉप रिव्ह्यू इन ईटरी या पुरस्काराने गौरविण्यात आले.

2024 IFBA मध्ये 11 मुख्य गटांतील 33 उपगटांमधून प्रतिभावंतांना ओळख मिळाली. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लॉग, यूट्यूब, मीडिया, हॉस्पिटॅलिटी, सार्वजनिक मतदान, FBAI स्टार, उद्योग सहकार्य, शिक्षण, पीआर एजन्सी तसेच हॉस्पिटॅलिटी आणि पाककला उद्योगातील योगदान या श्रेणींचा समावेश होता. यावर्षीच्या समारंभात भारताच्या सदाबहार खाद्य व पेय उद्योगक्षेत्राचे द्योतक असणाऱ्या एकूण 155 विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

समारंभात गोदरेज यम्मीज, गोदरेज जर्सी, गोडरेज रियल गुड चिकन आणि गोदरेज विक्रोळी कुकिना या गोदरेजच्या मालकीच्या ब्रँड्सचे एकत्रीकरण दर्शविण्यात आले. गोदरेज जर्सी योगर्ट वॉल आणि गोदरेज जर्सी स्वीट शॅक ही आकर्षक इन्स्टॉलेशन्स विशेष आकर्षण ठरली. त्यांनी खाद्यप्रेमींना आकर्षित करण्यात यश मिळवले. आगामी थॅंक्सगिव्हींग साजरा करण्यासाठी आणि खाद्यप्रेमींच्या समुदायाला परतफेड करण्यासाठी गोडरेज फूड्सने थँक्सगिव्हिंग ग्रेझिंग टेबलही  आयोजित केले. त्यामध्ये यम्मीज प्रॉन्स रिसॉइस आणि यम्मीज पनीर पॉप स्क्युअर्स विथ काल्डिन ड्रिझल यांसारख्या पदार्थांचा समावेश होता. या प्रदर्शनाने ब्रँडच्या पाककृतींचा अनुभव दिला आणि सामुदायिक भावना आणि एकोपा वाढवला.

या कार्यक्रमातील सर्वाधिक प्रतीक्षित क्षणांपैकी एक म्हणजे गोदरेज यम्मीजतर्फे बनविण्यात आलेल्या STTEM 2.0 – इंडिया’ज फ्रोजन स्नॅक्स रिपोर्टचे अनावरण. हे अनावरण गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कॉर्पोरेट ब्रँड अँड कम्युनिकेशन्सचे चीफ कम्युनिकेशन्स ऑफिसर श्री. सुजीत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शेफ संज्योत कीर, शेफ सब्यसाची गोरई आणि कल्याण कर्माकर उपस्थित होते.

या सादरीकरणाच्या निमित्ताने गोदरेज फूड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय पारनेकर म्हणाले, “भारतीय फ्रोजन स्नॅक रिपोर्टची दुसरी आवृत्ती सादर करताना मला खूप आनंद होत आहे. या अहवालात भारतात बदलत असलेल्या स्नॅकिंग संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी सतत बदलत असताना स्नॅकिंग आता विविध प्रसंगांचा औचित्यपूर्ण, महत्वाचा भाग बनले आहे. फक्त भूक भागवण्यापुरते हे मर्यादित नसून तो एक अनुभव बनत आहे. पार्टींपासून वीकेंड ट्रीट्सपर्यंत आणि मूड चांगला करण्यासाठीही  स्नॅकिंग हा महत्त्वाचा भाग बनत आहे. यातून भारतातील खाद्यपदार्थ आणि पेय उद्योग यांच्या भविष्याला एकत्रित आकार येत असताना हे सादर करण्यासाठी IFBA 2024 सारखा प्लॅटफॉर्म मिळणे यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही.” 

पुरस्कारांवर भाष्य करताना गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट ब्रँड आणि कम्युनिकेशन्सचे मुख्य संज्ञापन अधिकारी सुजित पाटील म्हणाले, “विक्रोळी कुकिना हा सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण खाद्यसमुदाय वाढवण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. एफबीएआयसोबतच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीमुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यामुळे भारताच्या खाद्यसंस्कृतीचे वर्णन करणाऱ्या उत्कृष्ट प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला मान्यता मिळते. पाककलेतील उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठीच्या, देशभरातील विविध संस्कृती आणि चवींना जोडण्याच्या आमच्या सामायिक ध्येयाला चालना देण्याचे काम या क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मानाने होत आहे. भारताच्या खाद्यजगतात नव्या आयामांची भर घालणाऱ्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.”

क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सूरी म्हणाले, “IFBA 2024 सोबत भागीदारी करताना गोदरेज जर्सीमध्ये आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे.  नाविन्यतेला प्रेरणा देणाऱ्या तसेच खाद्य व पेय उद्योगातील प्रवाहांची पुर्नव्याख्या करणाऱ्या शेफ आणि फूड ब्लॉगर्स यांच्या प्रभावशाली समुदायाला एकत्र आणणे हे आमचे ध्येय आहे. आनंदी आणि उच्च दर्जाचा डेअरी अनुभव देण्यातील आमची बांधिलकी या सहयोगातून प्रतीत होते. आमच्या योगर्ट वॉल आणि जर्सी स्वीट शॅकद्वारे सर्जनशीलतेला चालना देण्याचे आणि आपल्या लाडक्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेण्यातील आनंद साजरा करण्याचे ध्येय आहे.  FBAI आणि विक्रोळी कुकिना यांच्यासोबत आम्ही सहयोग वाढवण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी आणि F&B क्षेत्राला प्रेरित करणाऱ्या उत्कटतेचा उत्सव साजरा करण्यासाठी तत्पर आहोत.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!