google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘हे’ होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री…

आगरतला:

त्रिपुरामध्ये बिप्लब देब यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने माणिक साहा (Manik Saha) यांना नवे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप (BJP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहा यांच्या नावासह अनेक नावांची चर्चा सुरु होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता ते लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील.

यापूर्वी शुक्रवारी 13 मे रोजी बिप्लब देब (Biplab Kumar Deb) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट देखील घेतली होती. या बैठकीच्या अवघ्या 24 तासांनंतर 14 मे रोजी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देखील सादर केला होता.

राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब यांनी हायकमांडच्या सांगण्यावरूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पक्ष आपल्यासाठी सर्वांत वरचा आहे आणि पक्षाकडून जी काही जबाबदारी येईल, ती आपण पार पाडू, असेही ते यावेळी म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!