google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘भिडेच्या मिशा कापणाऱ्याला लाखाचे बक्षीस व राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार’

सातारा (महेश पवार) :

काही दिवसापूर्वी संभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य केले आहे, त्या निषेधार्थ आज म्हसवडला प्रा. कविता मेहत्रे व प्रा. विश्वबर बाबर सर यांच्या नेतृत्वाखाली थाळी नाद आंदोलन करण्यात आले.त्यावेळी म्हेत्रे बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की महापुरुषांची बदनामी करणारा माणूस देशभक्त असूच शकत नाही, त्याच्या मिशा तोडल्या पाहिजेत, त्याच्या मिशा तोडणाराला एक लाख रूपये व राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार माझ्या तर्फे मी जाहीर करीत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा. बाबर यांनी सांगितले की संभाजी भिडे सारख्या माणसाचे विधानसभेत समर्थन करणारे सरकार उलटावून टाकणं ही तुमची आमची जबाबदारी आहे, सामान्य नागरिकांनी शंकराचा तिसरा डोळा उघडण्याची वेळ आली आहे, महापुरुषांची बदनामी करणारा संभाजी भिडे याच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!