google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

सोसायटीमार्फत कर्ज घेणारे शेतकरी व्याजदराबाबत अनभीज्ञ?

सातारा (महेश पवार) :

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी विकास सेवा सोसायट्या ह्या स्वायत्त संस्था असूनदेखील 100% अर्थसहाय्य जिल्हा बँकेकडून घेतलं जातं ते सचिवांना हाताशी धरून केलेल्या सुनियोजित षडयंत्रातून असा दावा परिसरातील माहिती अधिकारी किशोर शिंदे यांनी केला आहे

बँकेच्या सचिवांची कार्यपद्धती, राहणीमान एखाद्या तहसीलदार किंवा महसूल खात्यातील नोकरशहा यांना पण लाजवेल ह्या प्रकारचं आहे हे सुद्धा सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय. ह्याचं कारण सचिव आणि जिल्हा बँक कारभारी यांच्यातील अघोषित आर्थिक, राजकीय हातमिळवणी होय.

कण्हेरखेड गावचे माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी सातारा जिल्हा बँक व्यवस्थापनाला अनेक वेळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना होत असलेल्या सर्व प्रकारच्या कृषी व कृषी उपयोगी कर्जाच्या पुरवठ्याच्या व्याजदराबाबत विचारणा केली आहे. विकास सेवा सोसायटीमध्ये ह्या शेतकऱ्यांना वाटप होत असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदराचा तक्ता लावला जात नाही. जिल्ह्याच्या लीड बँकेच्या पत धोरणात काही टक्के तरतूद जिल्हा बँकेसाठी असली तरी विकास सेवा सोसायटीच्या संपूर्ण व्यवसायावर जिल्हा बँकेच्या अधिकच्या व्याजदर असलेल्या व्यवसायाची 100% मक्तेदारी आहे. सर्वात मोठा विनोद की जिल्हा बँकेतून कर्ज घेणं विकास सेवा सोसाट्याना बंधनकारक नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

मागील २.६ वर्षाच्या कोरोना महामारीच्या खडतर कालखंडात जगभरातील बँकांनी त्यांच्या कर्जदारांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देत, मोठया प्रमाणात दिलासा दिला आहे, अनेक उद्योग धंद्यांना व्याजात सवलती देत ते सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरातील बँका एक अंकी व्याजदरावर असताना, सोसायटी मधील कर्जे शेतकऱ्यांना आजही दोन अंकी व्याजदरात शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांची बँक म्हणून नावारूपाला आलेल्या सातारा जिल्हा बँकेने मागील 3 वर्षात शेतकऱ्यांना असा काय दिलासा दिला, कशा प्रकारे व्याज आकारणी केली याविषयाबद्दल माहिती घेण्यासाठी किशोर शिंदे यांनी जिल्हा बँक, सहकार प्रशासन यांना अनेक वेळा पाठपुरावा करून देखील बँकेच्या व्यवस्थापनाने काहीही उत्तर दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सातारा जिल्ह्यातील 953 विकास सेवा सोसायट्या ह्या स्वायत्त संस्था असूनदेखील जिल्हा बँकेच्या अधिकच्या, महागड्या व्याजदराची प्रकरणे सचिवांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात यशस्वी झालेत हे खरे आहे. गोदरच बाजार भाव,शेतीचे अनेक प्रश्न याबरोबर आर्थिक स्वायत्तता हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न कधी सुटणार?? असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर स्वस्त दराचा पर्याय हा उपलब्ध झालाच पाहीजे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती जिल्ह्यातील बँकेने 953 विकास सेवा सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना करत असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांचा ( loan interest chart) व्याजदर तक्ता जिल्ह्यातील प्रत्येक विकास सेवा सोसायटीमध्ये लावत पारदर्शी कारभार करावा.. परंतु सातारा जिल्हा बँक ह्यावर जाणीवपूर्वक उत्तर द्यायला तयार नसल्याचे किशोर शिंदे यांचे म्हणणे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!