‘क्रशर विरोधातील ती तक्रार खोटी’
सातारा:
करंडी येथील क्रशरविरोधात करंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी , तहसीलदार यांच्याकडे केलेली तक्रार खोटी असल्याचा वसंत लेवे यांनी राष्ट्रमतकडे खुलासा केला असून सुरू असलेला क्रशर हे सर्व परवानगी घेऊनच सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
दरम्यान करंडी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमध्ये घरांना तडे जात असल्याचे म्हणणं चुकीचं आहे कारण त्या क्रशर जवळ कामगारांची घरे आहेत त्यांना भेगा पडत नाहीत मग क्रशर पासून लांब असलेल्या घरांना कसे तडे जातील असा उलट सवाल लेवे यांनी उपस्थित केला असून आमच्या खानी मुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. त्यासंबंधी आम्ही सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच हे क्रशर सुरू आहे , यामुळे ग्रामस्थांनी अडवलेल्या रस्त्याच्या संबधी तहसीलदार यांच्याकडे रस्ता खुला करून मिळावा यासाठी आम्ही कायदेशीर मागणी केली आसल्याची माहिती वसंत लेवे यांनी दिली .