‘त्या’ फिटनेस प्रमाणपत्राबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा खुलासा…
सातारा (महेश पवार) :
राष्ट्रमतमध्ये सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 56 बेकायदेशीर फिटनेस संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लेखी खुलासा केला आहे.
या खुलाशानुसार त्या फिटनेस संदर्भात दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामकाजाचे पूर्वीच्या आदेशामध्ये बदल करून सुधारित आदेश देण्यात आले आहेत. या खुलाशानुसर तत्कालीन नियंत्रक अधिकारी यांचे आदेशान्वये कामकाज पार पडले जात होते. त्यामुळे बातमीमध्ये दर्शविलेल्या कामासाठी तत्कालीन आदेश लागू असल्याचे म्हटले आहे. तसेच दिनांक ७ सप्टेंबर 2021 रोजी पूर्वीच्या आदेशात कोणताही बदल केला नव्हता असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
तसेच सप्टेंबर 2021 मध्ये परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्र कामासाठी ना हरकत जारी करणे, तसेच इतर कार्यालयातून आलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुढील कारवाई करणे, किंवा कार्यालयीन अभिलेखावरील वाहनांना इतर राज्यात फिटनेस प्रमाणपत्रासाठी न हरकत देणे, व त्यापुढील कारवाई करणे बाबत तत्सम कामकाज हे कार्यालय प्रमुख यांच्या पूर्वपरवानगीने करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.
यामुळे सप्टेंबर 2021 च्या आदेशापूर्वी अशा प्रकारचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.