शिंदे गटाला मिळेनात साताऱ्यात कार्यकर्ते…
सातारा (प्रतिनिधी):
एकनाथ शिंदेंच्या बंडाने राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झाला यात आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी पळवापळवी सुरू झाली. राज्यभरात नव्हे तर देशात चर्चा रंगली ती एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची मात्र सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी फोडण्यात शिंदे गटाला यश आले नाही. यामुळे शिंदे गटाला सातार्यात चांगले पदाधिकारी भेटत नसल्याने सातारा जिल्ह्याला मुंबई पुण्याचे संपर्कहिन संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख दिले गेले असल्याचे चित्र दिसत आहे.
शिंदे गटाकडून सातारा जिल्ह्यात झालेल्या नेमणुकासाठी मुख्यमंत्र्यांचे खरतर आभार मानले पाहिजेत. कारण ज्या लोकांनी शिंदे गटाला पाठींबा दर्शविला आहे ते एक तर त्यांच्या निष्क्रियते मुळे चळवळीच्या प्रवाहातून कधीच बाहेर फेकले गेले होते. आणि जे पदावर होते ते केवळ नामधारी होऊन जागा आडऊन बसले होते. ज्या प्रमुख नेमणुका झालेल्या आहेत त्यांचा कसल्या ही प्रकारे समाजहिताच्या गोष्टींशी ,संघटना वाढीसाठी संबंध राहिला नव्हता. त्यामुळे मुळ शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या लोकांमुळे नव्या कर्तृत्ववान लोकांना चांगली संधी मिळेल. वस्तुस्थिती मध्ये सातारा जिल्यात शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या कार्यकर्तृत्व व उतम जनसंपर्कमुळे बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते सोडले तर 100 टक्के शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये याची प्रचिती सर्वांना नक्की आल्या शिवाय राहणार नाही!! अशा शब्दांत
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त केली.