गोवा सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील 21 सदस्यांची टीम अयोध्येत महर्षी वाल्मिकी विमानतळावर दाखल झाली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत यावेळी त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत या देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री सावंत यांनी सपत्नीक रामलल्लाचे दर्शन घेऊन गोवा आणि गोमन्तकीयांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर सोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 22 जानेवारी रोजी गोव्यातील प्रत्येक मंदिरात भजन प्रभू रामाची पूजा करण्यात आली, अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली.
उत्तर प्रदेश सरकारने जागा दिल्यानंतर अयोध्येत गोवा भवन उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह अयोध्येत श्री रामल्लाचे दर्शन घेत गोव्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.