google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

कराड (अभयकुमार देशमुख) ;

विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


विजय दिवस समारोहातील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समितीचे विनायक विभुते, सहसचीव विलासराव जाधव, उद्योजक दिपक अरबुणे, सलिम मुजावर, विजय दिवस समितीचे मीनल ढापरे, चंद्रकांत जाधव , रमेश जाधव, प्रा. बी एस खोत, रत्नाकर शानभाग, परवेझ सुतार, महालिंग मुंढेकर, सतीश उपळाविकर आदी उपस्थित होते.

अॅड मोहिते म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रौप्यमहोत्सव विजय दिवस साजरा होत आहे. विजय दिवस समीतीतर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव यशवंत पुरस्कार देवुन गौरवण्यात येते. आत्तापर्यंत जेष्ठ नेते पी. डी. पाटील, संभाजीबाबा थोरात, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, नाननाथआण्णा नायकवडी, आचार्य शांताराम गरुड, भाई संपतराव पवार, अशोक गोडसे, क्रीकेटर चंदु बोर्डे, उद्योजक बाबासाहेब कल्याणी, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजरीव कदम, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, कृषीतज्ञ सदुभाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहेत. यंदाचा पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे.

१५ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात पुरस्काराचे वितरण आणि ब्रिगेडीयर जेम्स थॉमस व पोलिस अधिक्षक समीर शेख यांचा विषेश पुरस्काराने सन्मान होईल. याच कार्यक्रमात वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कऱ्हाड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कऱ्हाड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कऱ्हाड) यांनाही गौरवण्यात येईल. त्याच कार्यक्रमास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या उपस्थितीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन होईल.

कर्नल पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

१५ डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्यांच्यामुळे कऱ्हाडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे ते विजय दिवसचे अध्यक्ष कर्नस संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारीत ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्यास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे व मान्यवर उपस्थित राहतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!