google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

टँकरचे पाणी ; ‘एफडीए संचालकांनी हात वर केल्याने गोमंतकीयांनी सतर्क राहावे’

पणजी :

गोमंतकीयांना स्वच्छ, प्रदूषित विरहीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची नसल्याचे सदर खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी स्पष्ट केल्याने आता गोमंतकीय नागरिकांनी सतर्क राहून त्यांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता स्वत:च तपासण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे.

काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांसह एफडीएच्या संचालकांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या टॅंकरमधून मलमूत्र नेले जात असल्याच्या घटनेचा संदर्भ देत निवेदन दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.


सांकवाळ येथील पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी वाहून नेल्याची घटना त्यांच्या विभागाला माहिती नसल्याचे एफडीएच्या संचालकांनी स्पष्टपणे कबूल केले हे धक्कादायक आहे. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असून गोव्यातील नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली तेव्हा अभियंत्यांनी आम्हाला गोव्यात 80 एमएलडी पाण्याची कमतरता आहे आणि लोक टँकरने पाणी घेत आहेत अशी माहिती दिली. दुर्दैवाने, पाण्याचे टँकर दूषित पाणी पुरवतात आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एफडीएकडे कोणतीही यंत्रणा नाही, असे कॉंग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.

आज पणजी आणि गोव्यातील इतर भागातील ज्येष्ठ नागरिक भाजप सरकारला लोकांचे जीवन धोक्यात घातल्याबद्दल शाप देत आहेत. एफडीए विभागाची अकार्यक्षमता आज पूर्णपणे उघड झाली आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

आम्ही एफडीए संचालकांना पाण्याच्या टँकरमधून वाहून नेल्या जाणार्‍या सांडपाण्याचा घटनेची चौकशी करण्यासाठी तसेच व्यावसायिक आणि निवासी घरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यासाठी एका आठवड्याचा अल्टिमेटम देऊन निवेदन दिले आहे. एफडीएने कारवाई न केल्यास आम्ही मोठे आंदोलन करू. काँग्रेस पक्ष या विषयावर जलस्त्रोत खात्यालाही भेट देणार असल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळात कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, मोरेनो रिबेलो, मनीषा उसगावकर, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा, विशाल वळवईकर, जॉन नाझारेथ, मुक्तमाला फोंडवेकर, नौशाद चौधरी, जोएल आंद्राद आणि इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!