नियम डावलून कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली ‘ती’ इमारत?
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील काशीळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणार्या नॅशनल हायवे लगत ग्रामपंचायत तसेच नॅशनल हायवे प्राधिकरणाची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नसताना देखील आठ माळ्याची बिल्डिंग हायवे लगत उभारली असून भविष्यात या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे ग्रामपंचायत काशिळ यांनी सिकंदर शेख यांना तब्बल दोन वेळा नोटीस काढून आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास सांगून देखील संबधिताने पैशांच्या जोरावर व राजकीय दबावाखाली बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.
काशिळ ग्रामपंचायतीने मोठ्या धाडसाने संबंधितावर नोटीस काढली परंतू अद्याप संबंधितांवर कारवाई झाली नाही, मात्र नॅशनल हायवे प्राधिकरण यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.