google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

वेण्णा नदीवरच बेकायदेशीर बांधकामे करून पाण्याचा प्रवाह रोखला?

सातारा (महेश पवार):

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगमस्थान असलेल्या वेण्णा नदी च्या वाई – महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा नदीवरील पात्रात अनेकांनी बेकायदेशीर हॉटेल बांधकामे करून नदी चा प्रवाह रोखला असून यामुळे वेण्णा नदीचे नाल्यात रूपांतर झाल्याचे चित्र दिसते , नदी पात्रात बांधकामे झाल्यानं दर पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नदीचे पाणी रस्त्यावरुन वाहतं आणि परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊन रस्ते बंद होतात . तरी देखील जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने न घेता या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्स उभी करणार्यावर कारवाई चे धाडस दाखविले नाही.

महाबळेश्वरच्या प्रवेशद्वारावरच वेण्णा नदीवरील बांधकामे तहसीलदार आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या आशीर्वादाने उभारली गेली असल्याची चर्चा असून , या बेकायदेशीर हॉटेल्स कडून मलई मिळत असल्याने कारवाई होत नसल्याची स्थानिकांच्या मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे , यामुळे आता जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः लक्ष घालून वेण्णा नदीचा प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!