गोवा

दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राजीव गांधींना अभिवादन

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे दहशतवाद विरोधी दिनानिमित्त माजी पंतप्रधान Rajiv Gandhi यांना अभिवादन करण्यात आले. बांबोळी येथील राजीव गांधी मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.


यानंतर पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या स्मृतींना पुष्पांजली वाहण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थितांना शांतता, सामाजिक सलोखा आणि दहशतवादाविरोधातील शपथ दिली.


यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी प्रदेशाध्यक्ष फ्रांसिस्को सार्दिन, एम. के. शेख, तुलियो डीसूझा, सुभाष फळदेसाई, सावियो डीसूझा, अमरनाथ पणजीकर, राजन घाटे, अर्चित नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


वक्त्यांनी राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव करताना पंचायत राज व्यवस्था, महिलांना आरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांचा उल्लेख केला. तसेच १८ वर्षांच्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णयही त्यांनी घेतल्याचे नमूद करण्यात आले.

अमित पाटकर यांनी आपल्या भाषणात गोव्यात शांतता, ऐक्य आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे आवाहन केले. तसेच Rahul Gandhi लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी संघर्ष करत असल्याचे सांगत जनतेने त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!