देश/जगमहाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांचा वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या सीजेपी (Cockroach Janta Party) आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करत केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने संवाद साधावा, अशी मागणी केली.


पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा प्रश्न हा केवळ राजकीय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. सर्व विरोधी पक्षांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.


२० जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला शिवसेना (उबाठा) पाठिंबा देणार असून, महाराष्ट्रातही या प्रश्नावर आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षाचे खासदार हा मुद्दा उपस्थित करतील, असेही त्यांनी सांगितले.


सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत ठाकरे म्हणाले की, त्यांचे जीवन मौल्यवान आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे आणि सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी. दरम्यान, वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत असून त्यांच्या आरोग्यावर वैद्यकीय पथकाकडून नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!