
इंडियन पॅनोरमा २०२६साठी प्रवेशिका मागविल्या
इंडियन पॅनोरमामध्ये २५ फीचर चित्रपट (त्यापैकी ५ मुख्य प्रवाहातील चित्रपट), २० गैर-फीचर चित्रपट आणि ५ सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या भारतीय फीचर दिग्दर्शकांची निवड करण्यात येणार आहे. सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
याशिवाय, ५७व्या इफ्फीमध्ये जागतिक, आंतरराष्ट्रीय, आशियाई किंवा भारतीय प्रीमियर होणाऱ्या फीचर चित्रपटांना ‘न्यू होरायझन’ विभागात प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चित्रपट निर्मात्यांनी इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर लॉग इन करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्वाक्षरी केलेली आणि शिक्कामोर्तब केलेली हार्ड कॉपी, तसेच आवश्यक स्क्रीनिंग आणि प्रचार साहित्य १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आयोजकांकडे पोहोचणे आवश्यक आहे. १७ ऑगस्ट रोजी सुटी असल्यास त्यानंतरचा पहिला कामकाजाचा दिवस अंतिम मुदत म्हणून ग्राह्य धरला जाईल. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोजकांनी अर्जदारांना ऑनलाइन आणि हार्ड कॉपीतील माहिती एकसारखी असणे बंधनकारक असल्याचेही नमूद केले आहे.






